Jalgaon news : महापालिकेचा २४ मीटरचा रिंगरोड कागदावरच; प्रत्यक्षात 'साडेसात कोटीं'चा रस्ता फक्त २० मीटरचा

अतिक्रमणांचे 'ग्रहण' कायम असतानाच थाटामाटात उद्घाटन
Jalgaon news : महापालिकेचा २४ मीटरचा रिंगरोड कागदावरच; प्रत्यक्षात 'साडेसात कोटीं'चा रस्ता फक्त २० मीटरचा
Published on
Updated on

नरेंद्र पाटील

जळगाव: आशिया खंडातील सर्वात मोठी प्रशासकीय इमारत असल्याचा तोरा मिरवणाऱ्या जळगाव महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचा आणखी एक काळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरातील महाराणा प्रताप पुतळा ते भोईटे नगर रेल्वे गेट दरम्यानच्या अत्यंत महत्त्वाच्या रिंगरोडचे साडेसात कोटी रुपयांचा निधी खर्च करून सिमेंट कॉंक्रिटीकरण केले जात आहे. कागदावर २४ मीटर रुंदी असलेल्या या , अनेक ठिकाणी हा रस्ता आकसला आहे. प्रत्यक्षात हा रस्ता वीस मीटरच तयार होणार आहे त्यामुळे तब्बल ४ मीटरचा रस्ता गायब होणार आहे.

Jalgaon news : महापालिकेचा २४ मीटरचा रिंगरोड कागदावरच; प्रत्यक्षात 'साडेसात कोटीं'चा रस्ता फक्त २० मीटरचा
Kashedi Ghat Danger Zone: कशेडी घाटातील 'डेंजर झोन'चे काम रखडले; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

अतिक्रमणाचा विळखा कायम असतानाच, महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी आणि शहर अभियंत्यांनी मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रस्त्यावरील एकही अतिक्रमण न काढता महापौर दीपमाळा काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापतींच्या उपस्थितीत या रस्त्याचे वाजतगाजत उद्घाटनही उरकून घेण्यात आले. या रस्त्याच्या एका साईटच्या कामाला सुरुवातही झालेली आहे.

Jalgaon news : महापालिकेचा २४ मीटरचा रिंगरोड कागदावरच; प्रत्यक्षात 'साडेसात कोटीं'चा रस्ता फक्त २० मीटरचा
Nashik Ring Road - रिंगरोड अलाइनमेंट वादात भर

या रिंगरोडवर अलीकडच्या काळात अनेक मोठमोठ्या आणि आलिशान शोरूम्सचे इमले उभे राहिले आहेत. नियमानुसार या इमारतींच्या आत पार्किंगसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. रस्ता आणि शोरूमच्या मधील शासकीय मोकळ्या जागेवरच ग्राहकांच्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागाने डोळे मिटून या शोरूम्सचे लेआऊट मंजूर कसे केले? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Jalgaon news : महापालिकेचा २४ मीटरचा रिंगरोड कागदावरच; प्रत्यक्षात 'साडेसात कोटीं'चा रस्ता फक्त २० मीटरचा
Jalgaon News | नॅशनल हायवेचा रस्ता की शोरूमची खासगी पार्किंग? 'न्हाई'च्या सर्विस रोडवर शोरूमधारकांचा डल्ला

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर झालेल्या या साडेसात कोटींच्या रस्त्याची सुरुवात जरी २४ मीटरने होत असली, तरी पुढे प्रत्येक पावलावर रस्ता गिळंकृत करण्यात आला आहे. धक्कादायक आकडेवारी समोर आली.

२१.४० मीटर : गारवा बिर्याणी

सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान (भोईटे गेट)

२१.५० मीटर: युवर लुक्स

२१.६६ मीटर : ओपन स्पेस

२१.२० ते २३.३० मीटर : जिल्हा बँक

२२.२० मीटर : उज्जीवन स्मॉल बँक

२२.६० मीटर : प्रशांत क्लिनिक

२२.८० मीटर : आरुष्य व संकल्प हॉस्पिटल

२३.१० मीटर : मलबार गोल्ड

२३.२० मीटर : पियुष हॉस्पिटल

२३.३० मीटर : गुजर स्पाईन सेंटर

२३.५० मीटर: चैतन्य हॉस्पिटल / मेडिकल

२३.८० मीटर : पी. एन. गाडगीळ जवळ २६ मीटर आणि डॉ. भंगाळे यांच्याजवळ २४.३० मीटर जागा आहे.

Jalgaon news : महापालिकेचा २४ मीटरचा रिंगरोड कागदावरच; प्रत्यक्षात 'साडेसात कोटीं'चा रस्ता फक्त २० मीटरचा
Joggers track parking issue : कोपरखैरणेतील जॉगर्स ट्रॅकचा पार्किंगसाठी वापर

"रस्त्याच्या कमी-जास्त अंतराबाबत नगररचना विभागाला सूचना दिल्या आहेत. ते मोजमाप करतील. त्यानंतर संबंधित अतिक्रमण केलेल्या लोकांना नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्यात येईल."

योगेश बोरोले (शहर अभियंता)

"या रस्त्याचे काम पीडब्ल्यूडी करत आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे काम ज्यावेळेस सुरू होईल, त्यावेळेस अतिक्रमण काढण्यात येईल."

दीपमाळा काळे (महापौर)

"सदर रस्ता 'टू लेन बोथ साईड' करण्यात येणार आहे. एका बाजूला रस्त्याची रुंदी साडेसात ते आठ मीटर असेल आणि बाजूला शोल्डर म्हणून दोन मीटरची पेव्हर ब्लॉकची साईड असेल. असा 16 सोडा मीटर व फ्लेवर ब्लॉक चार मीटर असे मिळून वीस मीटर रस्ता होणार आहे म्हणजेभविष्यात मनपाने ओएफसी केबल अंडरग्राउंड टाकल्यास रस्ता खणावा लागू नये, म्हणून ही रस्त्याच्या बाजूला 2 मिटर ची सोय केली आहे."

श्री. महाजन (अधिकारी, PWD)

याबाबत ठेकेदाराशी संपर्क साधला असता, त्यांनी फोनवर बोलणे टाळले आणि केवळ मेसेज रेकॉर्ड करण्याचा संदेश देऊन पळ काढला.

गौरव पाटील (ठेकेदार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news