Jalgaon Burglary | उज्जैनला देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडणारे सख्खे भाऊ गजाआड; ३१ लाखांचे दागिने जप्त

रामेश्वर कॉलनीतील घरफोडीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; दाभाडे बंधूंच्या मुसक्या आवळल्या
Dombivli Burglary
Dombivli BurglaryPudhari
Published on
Updated on

Jalgaon Housebreak Case Solved

जळगाव : कुटुंब घर बंद करून मध्य प्रदेशातील उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले असल्याची संधी साधत रामेश्वर कॉलनीतील घर फोडून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या सख्ख्या भावांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. विशाल मुरलीधर दाभाडे (वय २५) आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे (वय २७, दोघेही रा. रामेश्वर कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३१ लाख २६ हजार ८०० रुपये किमतीचे २०८ ग्रॅम सोने आणि २८ ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

२७ ते २८ ऑगस्टच्या मध्यरात्री संगीता घुगे यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील दागिने घेऊन चोरटे पसार झाले. उज्जैन येथून देवदर्शन करून घरी परतल्यानंतर घुगे कुटुंबाच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ६९७/२०२६ अन्वये बीएनएसच्या कलम ३०५(ए), ३३१(३) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Dombivli Burglary
Jalgaon crime: बिअर बार मालक अन् सरपंचाचा गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार; विकास सोलंकेला पहाटेच बेड्या

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी विशेष तपास पथक नियुक्त केले. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान दाभाडे बंधू संशयाच्या भोवऱ्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

चौकशीत दोघांनी घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Dombivli Burglary
Jalgaon crime news: कारागृहाच्या भिंतीवर चढून फटाके फोडणे भोवले; वाढदिवसासाठी केला प्रकार, दोघांना अटक

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बबन आव्हाड, पीएसआय चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किरण चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news