Jalgaon crime|मध्यप्रदेशातील दोन अट्टल घरफोडी करणाऱ्यांना बेड्या; १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

मध्यप्रदेशातील दोन अट्टल घरफोडी करणाऱ्यांना बेड्या; १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
Jalgaon crime
Jalgaon crime
Published on: 
Updated on: 

जळगाव : शहरात बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय टोळीचा अमळनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन अट्टल घरफोड्यांना अत्यंत शिताफीने अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल करत १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहर परिसरात गेल्या काही महिन्यांत बंद घरे फोडण्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक तपास करत असताना, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा सुगावा लागला.

पोलिसांनी तांडा (जि. धार, मध्यप्रदेश) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नवलसिंह वनसिंह अलावा (वय ३९, रा. काकडवा, ता. कुक्षी, जि. धार) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारासह अमळनेर शहरात तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मध्यप्रदेशात धाव घेऊन त्याचा साथीदार केरु उर्फ केहरु इडीया डाबर (वय ४५, रा. बलेडी, ता. जोबट, जि. अलीराजपूर) याला बलेडी गावातून बेड्या ठोकल्या.

तीन गुन्ह्यांची झाली उकल

दोन्ही संशयितांच्या चौकशीत अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. शहराबाहेर मोटारसायकल उभी करून नदीजवळील कॉलनीतील बंद घर फोडून दागिने लांबवले होते. दुसरी चोरी- सिमेंट काँक्रीट रोडजवळील कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी केली होती. सिमेंट काँक्रीट रोड परिसरातील बंद घरातून रोख १० हजार रुपये, चांदीची गणपतीची मूर्ती आणि नाणे चोरून नेले होते. आरोपींकडून चांदीची गणपती मूर्ती, चांदीचे नाणे, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची गोळी, चांदीचे करदोडे, कडी व वाळ्या असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, सूर्यकांत साळुंखे, प्रशांत पाटील, उज्ज्वल पाटील, नितीन मनोरे, उज्ज्वल कुमार म्हस्के, नितीन कापडणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे गौरव पाटील व मिलिंद जाधव यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल शहरातून समाधान व्यक्त केले जात आहे

शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्यावर डल्ला मारणारी टोळी जेरबंद; फत्तेपूर पोलिसांचा दणका!

ऐन हंगामात कष्टाने पिकवलेल्या कापसावर डल्ला मारणाऱ्या आंतरगामी चोरांच्या मुसक्या आवळण्यात फत्तेपूर पोलिसांना यश आले आहे. शेंगोळा शिवारातील शेतातून कापूस लंपास करणाऱ्या शहापूर येथील तीन सराईत चोरांना पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती इको कार आणि चोरीचा कापूस असा एकूण २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या धडक कारवाईने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील तरुण शेतकरी सदानंद कैलास जोशी (वय २५) यांच्या शेतातील गोदामातून ९ ऑक्टोबरच्या रात्री चोरट्यांनी दीड क्विंटल कापूस लंपास केला होता. याप्रकरणी जोशी यांच्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध बी एन एस कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी विशेष तपास पथक कामाला लावले. तपास सुरू असतानाच गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांना जामनेर तालुक्यातील शहापूर येथे धाड टाकून संशयित आरोपी सैयद सोएब एजाज (वय ३१, रा. शहापूर, ता. जामनेर) सय्यद अनस महेमुद (वय १९, रा. शहापूर, ता. जामनेर) शेख मोहम्मद रेहान अब्दुल कादर (वय २७, रा. शहापूर, ता. जामनेर) या तिघा संशयितांना ताब्यात घेतले.

Jalgaon crime
Jalgaon burglary case solved|जळगाव शहर पोलिसांनी घरफोडीचा छडा लावला ६ तासांत, सराईत संशयिताला ठोकल्या बेड्या

पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कापूस चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी इको कार क्रमांक एम एच 20 एफ व्हाय 2540 तिची किंमत दोन लाख 50 हजार. एकूण जप्त मुद्देमाल २ लाख ५४ हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी बजावली.

Jalgaon crime
जळगाव : माजी सरपंच मारहाण प्रकरण | 'मारणाराही माझाच, मार खाणाराही माझाच’-आमदार किशोर पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news