Jalgaon Lok Sabha 2024 | जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेसाठी पारदर्शक, कार्यक्षम यंत्रणा सज्ज

Jalgaon Lok Sabha 2024 | जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेसाठी पारदर्शक, कार्यक्षम यंत्रणा सज्ज

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव आणि रावेर लोकसभेच्या जागेसाठी सोमवार (दि.1 मे) रोजी झालेल्या निवडणुकीनंतर 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेची पारदर्शक आणि कार्यक्षम तयारी झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पारपाडण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना राबवत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

03 जळगाव आणि 04 रावेर लोकसभा मतदार संघात प्रत्येकी 6 विधानसभा मतदार संघ आहेत. त्या प्रत्येक विधानसभानिहाय 14 मतमोजणी टेबल असतील. तर एका टेबलवर 1 मतमोजणी प्रतिनिधी प्रत्येक उमेदवाराला नियुक्त करता येतील तसे लेखी कळविण्यात आले आहे. निवडणूक प्रशासनाकडून प्रत्येक टेबलसाठी एका सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. टपाली मतमोजणीकरीता जळगावसाठी 10 आणि रावेरसाठी 8 टेबल ठेवण्यात आले आहेत. येथे देखील प्रत्येक टेबलनिहाय 1 याप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधी राहणार आहेत. उमेदवारांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी आपापल्या ओळखपत्रासह सकाळी 7 वाजता मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थिती राहण्याचे लेखी कळविण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सांगितले आहे.

मतमोजणी अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि प्रशिक्षण

मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी रिटर्निंग ऑफिसर पुरेशा संख्येने मोजणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करतील. ज्यात राखीव जागा असतील. या अधिकाऱ्यांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी सखोल प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. मतमोजणीच्या दिवशी, अधिकारी सकाळी 5:30 पर्यंत केंद्रावर पोहोचतील, त्यांचे फोटो ओळखपत्र घेऊन जातील आणि RO आणि ARO च्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करतील अशी माहितीही जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.

पोस्टल मतमोजणी

ईव्हीएम मतदानापूर्वी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल. मतपत्रिका मतमोजणी व्यवस्थापनासाठी अतिरिक्त निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (एआरओ), एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहाय्यक आणि एक सुक्ष्म निरीक्षक यांच्याद्वारे केले जाईल. मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पारदर्शकतेसाठी या प्रक्रियेची संपूर्ण व्हिडिओग्राफी केली जाणार असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news