Jalgaon Temperature | सूर्याचा तडाखा वाढला: जळगावमध्ये तापमान ४२ अंशांच्या उंबरठ्यावर

शहरात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या तीन दिवसांपासून तापमान सातत्याने ४१ अंशांच्या पुढेच राहिले
Hot and humid Weather
Hot and humid Weather Pudhari News Network
Published on
Updated on

Jalgaon Heatwave 2026

जळगाव: जळगाव शहरात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या तीन दिवसांपासून तापमान सातत्याने ४१ अंशांच्या पुढेच राहिले आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून सूर्य जणू आग ओकत असल्याचे चित्र दिसत आहे. आज तापमान ४१.९ अंशांवर पोहोचल्याने जळगावचा पारा ४२ अंशांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

उष्णतेचा चढता आलेख
गेल्या ७२ तासांत तापमानात सातत्याने वाढ झाली आहे. २० एप्रिल रोजी कमाल तापमान ४१.६ अंश होते, ते २१ एप्रिलला ४१.८ अंशांवर गेले, तर २२ एप्रिलला ते ४१.९ अंशांवर पोहोचले. किमान तापमान २३ अंशांच्या आसपास स्थिर राहिले असले तरी दुपारच्या उन्हाचा त्रास प्रचंड वाढला आहे.

Hot and humid Weather
Jalgaon Collector Office | अधिकारी अनुपस्थित, तरीही कुलर सुरूच; जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात विजेचा अपव्यय

आर्द्रता घटली, कोरड्या उन्हाचा तडाखा
२० एप्रिल रोजी झालेल्या हलक्या पावसामुळे आर्द्रता ७७ टक्क्यांपर्यंत वाढली होती, त्यामुळे उकाडा जाणवत होता. मात्र त्यानंतर पाऊस थांबल्याने आर्द्रता घटून ५८ टक्क्यांवर आली आहे. परिणामी आता कोरड्या उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असून अंगाची लाहीलाही होत आहे.

दुपारच्या वेळेत रस्ते ओस
उष्णतेमुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. शहरात थंड पेयांच्या दुकानांवर गर्दी वाढली असून घराघरांत कूलर आणि एसीचा वापर वाढला आहे.

Hot and humid Weather
Jalgaon news: एकच मिशन, जुनी पेन्शन.., जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले; सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

४२ अंशांचा टप्पा गाठण्याची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तापमानात अशीच वाढ सुरू राहिल्यास जळगाव लवकरच ४२ अंशांचा आकडा पार करू शकतो.

उष्णतेपासून बचावासाठी सूचना

  • दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे

  • भरपूर पाणी आणि थंड पेये घ्यावीत

  • बाहेर पडताना डोक्याचे संरक्षण करावे

  • हलके व सुती कपडे परिधान करावेत

या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news