जळगाव : शॉक सर्किटमुळे फिटनेस क्लबमध्ये आग, जीवितहानी नाही

जळगाव : शॉक सर्किटमुळे फिटनेस क्लबमध्ये आग, जीवितहानी नाही

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – भुसावळ शहरातील जामनेर रोडवर असलेल्या चौथ्या मजल्यावरील फिटनेस क्लबला पहाटे 5:45 वाजता शॉक सर्किटमुळे आग लागली. भुसावळ अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

जामनेर रोडवर आयसीआयसीआय बँक असलेल्या इमारतीमधील चौथ्या मजल्यावर एम एच फिटनेस क्लबमध्ये सकाळी 5:45 वाजता शॉक सर्किटने आग लागल्याची घटना घडली आहे. भुसावळ नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले असून  अधिकारी विवेक माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी फायरमन दिनेश पुरोहित, विजय मनोरे, सुमित सावळे, रितेश पगारे, ऋषीकेश सहानी, रवी पाटील, कृष्णा बऱ्हाटे, शुभम मिरगे यांनी चौथ्या मजल्यावर पाणी मारण्यास बाहेरून सुरुवात केली. काही फायरमन यांनी जिन्याने वर जात फायर बॉल एसटी मिशरचा मारा केला. वाहन चालक – भूषण सोनवणे, किरण जावळे यांनी अग्निशामक दलाच्या वाहनाने आग लागलेल्या तत्काळ चौथ्या मजल्यावरील फिटनेस क्लबमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाऊण तासाचा अवधी लागला. या आगीमुळे फिटनेस क्लबमध्ये असलेल्या व्यायामाच्या साहित्य व इतर वस्तू याप्रमाणे 20 लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news