Jalgaon District Bank Election|जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचा पेच कायम; चार मतदारसंघांवरील निर्णय प्रलंबित

Jalgaon District Bank Election | पाचोऱ्यात सुमित पाटील यांचा अर्ज सहनिबंधकांकडून वैध; रात्रीच्या बैठकीनंतरही जागावाटपाचा तिढा सुटेना
Jalgaon District Bank Election
Jalgaon District Bank election deadlock
Published on: 
Updated on: 

जळगाव: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (दगडी बँक) निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा पेच अद्याप कायम आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत जवळ येत असतानाही महायुतीच्या घटक पक्षांमध्ये एकमत झाले नाही. जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या जागांवरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते आणि त्यांचे वारसदार रिंगणात उतरल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र, जागा वाटपावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

चार मतदारसंघांत तिढा कायम

मुक्ताईनगर-बोदवड: या जागेवरून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात अद्यापही पेच कायम असून, दोन्ही बाजूंकडून या जागेवर दावा केला जात आहे.

Jalgaon District Bank Election
Jalgaon Bribe | जळगाव जिल्हा परिषदेत उपविभागीय अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात!

पाचोरा-भडगाव: आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील हे पहिल्यांदाच सहकार क्षेत्रातील निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला होता. मात्र, पाटील यांनी या निर्णयाविरोधात सहनिबंधकांकडे अपील दाखल केल्यानंतर त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. अर्ज वैध ठरला असला तरी, महायुतीकडून या जागेवर नेमकी कोणाची उमेदवारी अंतिम होणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

Jalgaon District Bank Election
NQAS Certification | जळगाव जिल्ह्याची दमदार कामगिरी; १२५ उपकेंद्रांना मानांकन

चोपडा: चोपडा मतदारसंघाच्या जागेवरही आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या गटाकडून उमेदवारीसाठी आग्रह धरला जात असल्याने या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

खलबते निष्फळ

जागावाटपाचा हा तिढा सोडवण्यासाठी जळगाव येथील एका हॉटेलमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची रात्री उशिरापर्यंत खलबते झाली. मात्र, या बैठकीतूनही ठोस मार्ग निघू शकलेला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत हा पेच न सुटल्यास महायुतीसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.