NQAS Certification | जळगाव जिल्ह्याची दमदार कामगिरी; १२५ उपकेंद्रांना मानांकन

८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणन; ३ उपकेंद्रांची राष्ट्रीय स्तरावरही मोहोर
Jalgaon 125 Primary Health Sub Centers Accredited
Jalgaon 125 Primary Health Sub Centers AccreditedPudhari
Published on: 
Updated on: 

Jalgaon 125 Primary Health Sub Centers Accredited

जळगाव : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळविले आहे. जिल्ह्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १२५ आरोग्य उपकेंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणन प्राप्त झाले असून, यापैकी ३ उपकेंद्रांनी राष्ट्रीय स्तरावरील मानांकनही मिळविले आहे.

राज्यस्तरीय प्रमाणन मिळविलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वाकडी, वाकोद, नेरी (ता. जामनेर), पिंपरखेड (ता. भडगाव), लोहारा (ता. पाचोरा), ढेकू, मारवड आणि जानवे (ता. अमळनेर) यांचा समावेश आहे.

Jalgaon 125 Primary Health Sub Centers Accredited
Jalgaon news: चोपड्यातील खाऱ्यापाडावमध्ये गांजाची ‘तगडी’ शेती; ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त

यापूर्वी जिल्ह्यातील २ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १७ उपकेंद्रांना प्रमाणन मिळाले होते. आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नव्याने ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १०८ उपकेंद्रांनी प्रमाणन मिळविले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमाणित आरोग्य संस्थांची संख्या वाढली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते, NQAS नोडल अधिकारी डॉ. करिश्मा जैन आणि डॉ. पंकज शिंपी यांनी या मोहिमेचे नियोजन केले.

Jalgaon 125 Primary Health Sub Centers Accredited
Jalgaon|'संजय राऊत म्हणजे ‘फेल हवामान शास्त्रज्ञ’; अंदाज कधीच खरा ठरत नाही!'

या प्रमाणनासाठी रुग्णसेवा, औषध उपलब्धता, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, प्रयोगशाळा सेवा, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि रुग्णांचे समाधान अशा निकषांचे मूल्यमापन करण्यात आले. या यशाबद्दल करिश्मा नायर यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.