Jalgaon Crime | भरदिवसा तलाठ्याच्या घरात चोरी; ५ तोळे सोने, ५० हजार लांबविले

File Photo
File Photo

जळगाव पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील शिरसोली येथे राहणाऱ्या व कानळदा येथे तलाठी असणाऱ्या व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरटयांनी भरदिवसा चोरी केली. भरदिवसा 5 तोळे सोने व 50 हजार रुपये चोरून चोरटे पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आकाश विजय काळे हे आपल्या आईसह तालुक्यातील शिरसोली प्र. न अशोक नगर येथे राहतात.  त्यांच्या आई सध्या उत्तर भारतात देव दर्शनाला गेल्या आहेत. आकाश काळे हे तलाठी असल्याने दि. 22 ते नेहमीप्रमाणे घर बंद करुन कानळदा येथे ड्युटीवर गेले. मात्र, दुपारी महिला त्यांना मेसचा डबा देण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या असता त्यांना दरवाजे उघडे दिसले. डबा देण्यासाठी आलेल्या महिलेने तत्काळ आकाश यांना फोन करुन घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली.

त्यांनी तत्काळ शिरसोली येथे आपल्या घरी येऊन पाहिले असतात घरातील कपाट उघडे दिसले. दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला दिसून आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घरातून 5 तोळे सोने व 50 हजार रुपये रोक रक्कमेची चोरी झाली होती.  जळगावहून श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसीचे निरीक्षक बबन आव्हाड, पोहेकॉ जितेंद्र राठोड आदींनी भेट दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news