Jalgaon Crime Rate | जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख चढता; २०२६ च्या पहिल्या सहामाहीतच अनेक गंभीर गुन्ह्यांत वाढ

खून, दरोडे, चोऱ्या आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ; गांजाविरोधातील कारवायाही दुप्पट
Jalgaon First Half Crime Report
Jalgaon First Half Crime ReportPudhari
Published on
Updated on

Jalgaon First Half Crime Report

जळगाव : जळगाव जिल्ह्यात २०२६ च्या पहिल्या सहामाहीत (जूनअखेर) गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः खून, दरोडे, चोरी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये २०२५ च्या तुलनेत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. दुसरीकडे, अवैध गांजा आणि अमली पदार्थांविरोधात पोलिसांनीही कारवाईचा वेग वाढविल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

खूनाच्या गुन्ह्यांत मोठी वाढ

२०२५ या संपूर्ण वर्षात जिल्ह्यात खूनाचे ३० गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी सर्व ३० गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती. या प्रकरणांत ६८ आरोपी निष्पन्न झाले असून ६५ जणांना अटक किंवा नोटीस बजावण्यात आली होती.

मात्र, २०२६ च्या जूनअखेरच खुनाचे तब्बल ६५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ६४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून २३३ आरोपींपैकी १७९ आरोपींवर अटक अथवा नोटीसची कारवाई करण्यात आली आहे.

Jalgaon First Half Crime Report
Jalgaon crime: अपघाताचा बनाव रचणारा नराधम पुतण्या रावेर पोलिसांच्या जाळ्यात

दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ

२०२५ मध्ये जिल्ह्यात दरोड्याचे ७ गुन्हे नोंदविण्यात आले होते. या प्रकरणांत ५७ आरोपींवर कारवाई झाली होती. २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांतच दरोड्याचे १९ गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये १३० आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी ८५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ

२०२५ मध्ये जिल्ह्यात चोरीचे एकूण ७०७ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ३१२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती. ३९७ आरोपींपैकी ३८८ आरोपींवर कारवाई झाली होती.

२०२६ च्या जूनअखेर चोरीच्या तब्बल १,३१७ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५१५ गुन्हे उघडकीस आले असून १७१ आरोपींपैकी १६३ आरोपींवर अटक अथवा नोटीसची कारवाई करण्यात आली आहे.

वाहन चोरीचे प्रमाणही वाढले

२०२५ मध्ये तीन आणि चारचाकी वाहन चोरीचे २८ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १७ गुन्ह्यांची उकल झाली होती. २२ आरोपींपैकी २० जणांवर कारवाई करण्यात आली होती.

२०२६ च्या जूनअखेर दुचाकी चोरीचे ६२६ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी १७७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या प्रकरणांत १७१ आरोपींपैकी १६३ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

तर तीन व चारचाकी वाहन चोरीचे ४३ गुन्हे दाखल झाले असून २२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २५ आरोपींपैकी २३ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

Jalgaon First Half Crime Report
Jalgaon Crime news: शेतात नेऊन विवाहितेवर वारंवार अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १ लाख उकळले

अमली पदार्थांविरोधातील कारवाई तीव्र

अवैध गांजा आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला आहे. २०२५ मध्ये एनडीपीएस कायद्यान्वये गांजासंदर्भातील १९४ गुन्हे दाखल झाले होते. सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती आणि २२१ आरोपी निष्पन्न झाले होते.

२०२६ च्या जूनअखेर गांजासंदर्भातील ४०१ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ३९९ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये ४३६ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

एमडी (MD) ड्रग्ज प्रकरणात २०२५ मध्ये एक गुन्हा दाखल होऊन ५९ ग्रॅम ४० मिलीग्रॅम अमली पदार्थासह सुमारे ५.९४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात सहा आरोपींवर कारवाई झाली होती.

तर २०२६ च्या जूनअखेर एकाच एमडी प्रकरणात २८ ग्रॅम ३६० मिलीग्रॅम अमली पदार्थ जमार्च २०२६ नंतर जिल्हा पोलीस प्रशासनात झालेल्या बदल्यांनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाभर कोंबिंग ऑपरेशनला गती दिली आहे. दिवसा आणि रात्री विशेष मोहिमा राबवून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. उघड्यावर मद्यपान करणारे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणारे, अमली पदार्थांची विक्री करणारे तसेच जुगार आणि सट्टा अड्ड्यांविरोधात सातत्याने कारवाया करण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर दिलप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ८० हजार रुपये आहे. या प्रकरणात पाच आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

Jalgaon First Half Crime Report
Jalgaon Crime | मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा; जिल्हापेठ पोलिसांची दमदार कामगिरी, ११ दुचाकींसह ३ आरोपी जेरबंद

कोंबिंग ऑपरेशनला गती

मार्च २०२६ नंतर जिल्हा पोलीस प्रशासनात झालेल्या बदल्यांनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाभर कोंबिंग ऑपरेशनला गती दिली आहे. दिवसा आणि रात्री विशेष मोहिमा राबवून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. उघड्यावर मद्यपान करणारे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणारे, अमली पदार्थांची विक्री करणारे तसेच जुगार आणि सट्टा अड्ड्यांविरोधात सातत्याने कारवाया करण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news