Jalgaon Crime news: शेतात नेऊन विवाहितेवर वारंवार अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १ लाख उकळले

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका विवाहित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिच्याकडून एक लाख रुपये उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
crime news
crime newsfile photo
Published on
Updated on

Jalgaon Crime news

जळगाव: जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका ३५ वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिच्याकडून एक लाख रुपये उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरनाळा येथील ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये ती स्वतःच्या शेतात टोमॅटो तोडत असताना आरोपी योगेश भरत इंगळे (रा. गोरनाळा, ता. जामनेर) हा तेथे आला. आरोपीने महिलेकडे पैशांची मागणी करत पैसे न दिल्यास तिची गावात बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

crime news
Sindhudurg Crime : लग्न करू देत नसल्याने युवतीचा खून

फिर्यादीनुसार, महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने शेतातील मका पिकात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते सार्वजनिक करण्याची धमकी दिली. या भीतीचा फायदा घेत आरोपीने त्यानंतरही तीन वेळा तिच्यावर अत्याचार केल्याचा तसेच व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत तिच्याकडून सुमारे एक लाख रुपये उकळल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी १६ जुलै रोजी रात्री ८.३२ वाजता फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राणी केशव जाधव करीत असून, आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

crime news
Jalgaon crime news: जळगाव जिल्ह्यात चोरांचा हैदोस! जामनेर, पाचोरा आणि जळगावात धाडसी चोऱ्या; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news