Jalgaon Crime News | खाऊचे आमिष दाखवून सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून

Jalgaon Crime News | खाऊचे आमिष दाखवून सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा गावातील ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार (दि. ११) रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास झाली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथे ६ वर्षे बालिका आपल्या आईवडील, दोन बहिणी, एक भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होती. गावात राहणारा एकाने पीडित बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवित मंगळवार (११) रोजी सायंकाळी ४ वाजता गावापासून जवळ असलेल्या चिंचखेडा शिवारातील शेतात घेऊन गेला. त्यावर त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून खून केला. दुसरीकडे दुपारी ४ वाजेपासून मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केली, अखेर रात्री ११ वाजता तिचा मृतदेह चिंचखेडा शिवारातील इंदासी माता मंदिरा जवळील केळीच्या शेतात तिचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला, तिच्या तोंडावर तसेच गळ्यावर जखमा दिसून आल्याने तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे दिसून झाले.

जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान अत्याचार करणाऱ्या नराधरामाला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मयत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी जोपर्यंत नराधमाला अटक होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्र घेतला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news