Jalgaon Accident | भडगाव-पारोळा मार्गावर बस- टेम्पोची समोरासमोर धडक; १ ठार, ५ जण गंभीर जखमी

सोयगावहून धुळ्याकडे जात होती एसटी बस
Accident News
प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
Updated on

Bhadgaon Parola road bus tempo collision

जळगाव : भडगाव–पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ आज ( दि. २० ) पहाटे एसटी बस आणि खासगी टेम्पोची भीषण धडक होऊन एकाचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

सोयगावहून धुळ्याकडे जाणारी महामंडळाची एसटी बस (क्र. MH-14-BT-1984) समोरून येणाऱ्या खासगी टेम्पोला (क्र. MH-19-CY-1606) धडकली. अपघात इतका जोरदार होता की दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले.

Accident News
Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिकेतील लाचखोर लिपीकाला रंगेहाथ अटक

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रशासन मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. यावेळी जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शेलार यांनी तातडीने जखमींना पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या अपघातात पंकज पाटील (३०, उंदीरखेडा) यांचा मृत्यू झाला आहे. तर मीराबाई सोनवणे (५५), निलाबाई सिरसागर (७५), अंजनाबाई पाटील (७०), मनोहर पाटील (६०), रमेश चौधरी (८०), मीराबाई पाटील (८०) आणि जानवी मोरे (१९) यांच्यासह इतर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर पारोळा व भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Accident News
Jalgaon News| जळगाव जिल्ह्यातील २९ गावांमध्ये उभारणार प्रेरणादायी शहीद स्मारके; अजित पवारांकडून निधीला हिरवा कंदील

सागर मराठे आणि यश ठाकूर यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. याशिवाय रघुनाथ गणपंत सोनवणे (ढेकू) हे देखील या अपघातात जखमी झाल्याचे समजते. काही जखमींची ओळख अद्याप पटलेली नसून अधिकृत माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news