Jalgaon Crime | अजिंठा चौफुलीवरील 'बेवारस' मृतदेहाचे गूढ उकलले; हॉटेल वेटरचा गळा आवळून काढला काटा

'एलसीबी'चा दणका: 'बेवारस' समजल्या जाणाऱ्या प्रकरणाचा २४ तासांत पर्दाफाश
Ajanta Chowphuli  hotel waiter murdered
Ajanta Chowphuli hotel waiter murdered Pudhari
Published on
Updated on

Ajanta Chowphuli hotel waiter murdered

जळगाव : अजिंठा चौफुली परिसरातील बाबा बॅटरीसमोर पडलेला मृतदेह 'बेवारस' असावा किंवा नैसर्गिक मृत्यू असावा, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही तासांतच थरारक उलगडा केला. हा निर्घृण खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. क्षुल्लक वादातून एका हॉटेल वेटरला लाथाबुक्क्यांनी तुडवून आणि गळा दाबून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ९ जानेवारी रोजी अजिंठा चौफुलीलगत बाबा बॅटरीसमोर एक ५०-५५ वयोगटातील व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरुवातीला ही व्यक्ती भिकारी किंवा बेवारस असावा, असा कयास लावला जात होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना खबऱ्यामार्फत हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याची माहिती मिळताच एलसीबीचे पथक कामाला लागले.

Ajanta Chowphuli  hotel waiter murdered
Jalgaon Crime | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; मदत करणाऱ्या महिलेलाही दोन वर्ष शिक्षा

सीसीटीव्हीने उघडले बिंग

तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढले. तसेच गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मयताची ओळख पटली. भाऊसाहेब अभिमन पवार (वय ५८, रा. पातोंडा, ता. अमळनेर) असे मृताचे नाव आहे. ते सध्या जळगावातील असोदेकर श्री मटन हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते.

तपासात निष्पन्न झाले की, हुसेन शेख आयुब शेख (वय ३०, रा. ट्रान्सपोर्ट नगर, जळगाव) याने भाऊसाहेब पवार यांना अमानुष मारहाण केली. केवळ मारहाण करून तो थांबला नाही, तर त्यांचा गळा दाबून जीव घेतला. गुन्हा केल्यानंतर आरोपी अजिंठा चौक, ट्रान्सपोर्ट नगर परिसरात निर्धास्तपणे फिरत होता. एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याला ट्रान्सपोर्ट नगर भागातून उचलले आणि एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.

Ajanta Chowphuli  hotel waiter murdered
Jalgaon Bribery | सातबाऱ्यावर नावे लावण्यासाठी ४ हजारांची लाच घेताना जामनेरचा तलाठी 'एसीबी'च्या जाळ्यात

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार अक्रम शेख, मुरलीधर धनगर, किशोर पाटील आणि राहुल कोळी यांच्या पथकाने केली. आरोपीवर बीएनएस २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि गणेश वाघ करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news