खेळाडू असतो तर रिटायर्ड झालो असतो, पण राजकारणात मी अजूनही नॉट आऊट!'

७ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याची 'जेसीएल'च्या मैदानात फटकेबाजी; खेळाडूंच्या फिटनेसवर आणि वयावर ओढले चिमटे
jalgaon news
खेळाडू असतो तर रिटायर्ड झालो असतो, पण राजकारणात मी अजूनही नॉट आऊट!'file photo
Published on
Updated on

"If I were an athlete, I would have retired by now; but in politics, I am still 'not out'!"

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शालेय जीवनात अनेक खेळांमध्ये पाय अडकल्याने मोठा खेळाडू होऊ शकलो नाही, मात्र राजकारणात 'फोकस' केल्याने आज सात वेळा आमदार आणि तीन वेळा मंत्रीपदाचा पल्ला गाठला आहे. खेळाडूची एक वयोमर्यादा असते, मात्र राजकारणात तुम्ही जेवढे जुने व्हाल, तेवढे 'कसलेले खेळाडू' बनता. मी आज भाजपचा सर्वात सिनियर नेता असलो तरी अजून 'म्हातारा' झालेलो नाही, अशा शब्दांत एका ज्येष्ठ नेत्याने आपल्या राजकीय प्रवासाचा आणि फिटनेसचा हुंकार भरला.

jalgaon news
Gulabrao Patil Davos remark | पुढच्या वेळी मी पण 'कोट' घालून दावोसला जाईन, तेव्हाच उद्योग मिळतील का?

जळगाव चॅम्पियन्स लीग (जेसीएल) च्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना या नेत्याने क्रिकेट, खेळ आणि राजकारण यांची अनोखी सांगड घातली. त्यांच्या या विधानानंतर उपस्थित क्रीडाप्रेमी आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

'फोकस'मुळेच सात वेळा आमदारकीचा रेकॉर्ड "मी गल्लीत क्रिकेट खेळायचो, पण त्यासोबतच खो-खो, कबड्डी आणि कुस्तीतही होतो. एका खेळावर लक्ष केंद्रित केले नाही, त्यामुळे मोठा खेळाडू होऊ शकलो नाही," अशी प्रांजळ कबुली देत त्यांनी तरुण खेळाडूंना यशाचा मंत्र दिला. कॉलेज संपल्यानंतर खेळाऐवजी राजकारणावर लक्ष केंद्रित केले, त्याचेच फलित म्हणजे सरपंचपदापासून सुरू झालेला प्रवास आज सात वेळा आमदार आणि तीन वेळा मंत्रीपदापर्यंत पोहोचलो असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. 'एका गोष्टीवर फोकस केल्यामुळे काय यश मिळते, याचे मी जिवंत उदाहरण आहे', असेही ते म्हणाले.

jalgaon news
Nashik Politics | नाशिकचे तीन मंत्री एकापाठोपाठ निशाण्यावर...

खेळाडू आणि राजकारणी यांच्यातील तुलना करताना त्यांनी राजकीय सोयीचा 'निवृत्ती'चा मुद्दा उपस्थित केला. "बरे झाले मी खेळाडू झालो नाही! खेळाडू झालो असतो तर आज वयानुसार घरी बसून निवृत्तीचे आयुष्य जगलो असतो. पण राजकारणात तसे नसते. येथे निवृत्ती नसतेच. उलट, तुम्ही जेवढे वयस्कर व्हाल, तेवढे राजकारणातले चांगले खेळाडू मानले जाता," असा टोला त्यांनी लगावला.

भाजपमधील सर्वात 'सिनियर' नेता सध्याच्या राजकीय घोडदौडीवर भाष्य करताना ते म्हणाले की, "आज भाजपच्या १४० आमदारांमध्ये मी सात वेळा निवडून आलेला सर्वात सिनियर नेता आहे. अनुभव गाठीशी आहे आणि शरीरानेही मी अजून म्हातारा झालेलो नाही." ७ वेळा सलग विजय मिळवूनही अजूनही तितक्याच ताकदीने मैदानात असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांनाही सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news