Jalgaon ​Heaven Cafe Damini Pathak raid |ना कॉफी, ना चहा, फक्त पडद्याआड अश्लील धंदे; ‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाचा दणका!

कॅफेच्या नावाखाली चाळे; चालकाविरोधात रामानंद नगर ठाण्यात गुन्हा दाखल
Jalgaon ​Heaven Cafe Damini Pathak raid
Jalgaon ​Heaven Cafe Damini Pathak raidAI image
Published on: 
Updated on: 

​जळगाव: शहरातील एका नामांकित कॉलेज परिसरात कॅफेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर दामिनी पथकाने जोरदार हातोडा चालवला आहे. कॉलेज परिसरातील गजानन चेंबरमध्ये थाटण्यात आलेल्या तथाकथित ‘हेवन कॅफे’वर दामिनी पथक आणि रामानंद नगर पोलिसांनी संयुक्त छापा टाकत अश्लील चाळे पुरवणारे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणी कॅफे चालक संशयित विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. इंदिरानगर, खेडी, जि. जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​दामिनी पथकाची अचानक धडक

जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातील दामिनी पथकातील महिला पोलीस अंमलदार सुनीता जाधव, वैशाली माळी, अंजली राजपूत व रीना महाजन या ३० सप्टेंबर रोजी दुपारी कॉलेज परिसरात गस्त घालत होत्या. त्यावेळी परिसरातील एका कॉलेजच्या पुढे काही अंतरावर असलेल्या ‘हेवन कॅफे’मध्ये अंधार करून महाविद्यालयीन मुला-मुलींना अश्लील चाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची पक्के वृत्त पथकाला मिळाले. दामिनी पथकाने तातडीने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना माहिती दिली.

अंधाऱ्या कंपार्टमेंटमध्ये आढळले तरुण-तरुणी

पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत आणि पंचांना सोबत घेऊन पथकाने दुपारी ४.१० वाजता हेवन कॅफेवर अचानक छापा टाकला. पोलिसांनी आत प्रवेश करताच तिथे तीन बाय तीन आकाराचे प्लायवूड आणि पार्टिकल बोर्डचे छोटे-छोटे कंपार्टमेंट तयार करून त्यांना बाहेरून जाड पडदे लावलेले आढळले.

या अंधाऱ्या कंपार्टमेंटमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत चाळे करताना रंगेहात मिळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष सर्वांची चौकशी करून त्यांना पालकांच्या धाकाने कडक तोंडी समज देऊन सोडून दिले.

​ना कॉफी, ना साखर; थेट अश्लीलतेचा बाजार!

पोलिसांनी संपूर्ण कॅफेची झडती घेतली असता धक्कादायक वास्तव समोर आले. दुकानाच्या दर्शनी भागावर कॅफेचा कोणताही वैध परवाना नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे तथाकथित ‘कॉफी शॉप’मध्ये कॉफी बनवण्यासाठी लागणारी साधी कॉफी पावडर, साखर, गॅस शेगडी किंवा कोणतेही साहित्य अथवा खाद्यपदार्थ जागेवर आढळले नाहीत. केवळ शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवून पडद्याआड गैरकृत्ये करण्यासाठीच हा ‘अड्डा’ चालवला जात असल्याचे निष्पन्न झाले.

Jalgaon ​Heaven Cafe Damini Pathak raid
जळगाव शहरात घाणीचे साम्राज्य, महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा 'कचरा फेको' एल्गार!

या प्रकरणी महिला अंमलदार सुनीता जाधव यांच्या फिर्यादीवरून चालक विजय पाटील याच्याविरुद्ध मपोका कलम १२९, १३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon ​Heaven Cafe Damini Pathak raid
Jalgaon Police Raid | शेतकऱ्यांना लुटणाऱ्या भंगार माफियांवर पोलिसांचा ‘वार’ : भंगार दुकानांवर छापे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news