Hatnur Dam water release : हतनूरचे ३२ दरवाजे उघडले; तापीकाठी ७० हजारांवर क्युसेकने पाण्याचा विसर्ग

गिरणा धरण ९६ टक्क्यांवर फुल्ल, एकाच दिवसात ३६२ दशलक्ष घनफूट आवक; नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा
Hatnur Dam water release : हतनूरचे ३२ दरवाजे उघडले; तापीकाठी ७० हजारांवर क्युसेकने पाण्याचा विसर्ग
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील जलप्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे प्रकल्प असलेल्या हतनूर आणि गिरणा धरणांमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग व आवक सुरू झाली आहे. हतनूर धरणाचे तब्बल ३२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून, तापी नदीपात्रात ७० हजार क्युसेकपेक्षा जास्त वेगाने पाणी सोडले जात आहे. दुसरीकडे, चाळीसगाव तालुक्यातील गिरणा धरणही ९५.९१% भरले असून, प्रशासनाने गिरणा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा (अ‍ॅलर्ट) जारी केला आहे.

शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी ६ वाजेच्या अहवालानुसार, हतनूर धरणात सध्या ७१.५२% एकूण तर ५६.६६% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणी पातळी २११.९३० मीटरवर पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ३२ रेडियल गेट्स १ मीटरने उघडून तापी नदीत ७०,०६५ क्युसेक (१९८४ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Hatnur Dam water release : हतनूरचे ३२ दरवाजे उघडले; तापीकाठी ७० हजारांवर क्युसेकने पाण्याचा विसर्ग
Hatnur Dam | हातनूर धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस: 66.88 टक्के पाणीसाठा; विसर्ग सुरू

दरम्यान, जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेले गिरणा धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात १६ मिमी पाऊस झाला असला, तरी वरच्या भागातून ३६२.८५ दशलक्ष घनफूट इतकी प्रचंड आवक झाली आहे. धरणाचा उपयुक्त साठा ५०२.१६२ दशलक्ष घनमीटरवर पोहोचला असून पाणीसाठा ९५.९१% झाला आहे. सध्या गिरणाचे सर्व दरवाजे बंद असले आणि कालव्यातून विसर्ग शून्य असला, तरी धरणातील वाढती आवक पाहता कोणत्याही क्षणी दरवाजे उघडून विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील गावांना महसूल व आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने हाय अ‍ॅलर्टवर ठेवले आहे.

Hatnur Dam water release : हतनूरचे ३२ दरवाजे उघडले; तापीकाठी ७० हजारांवर क्युसेकने पाण्याचा विसर्ग
Jalgaon Hatnur Dam | हतनूर धरणाचे २४ दरवाजे एक मीटरने उघडले; तापी नदीपात्रात ५२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

जिल्हा प्रशासनाने मुंबई वेधशाळा नुसार हवामानाचा अंदाज वर्तवला होता 30 व 31 रोजी येल्लो अलर्ट देण्यात आला होता यानुसारच इच्छा रात्रीपासून सुरू झालेला पाऊस 31 च्या सकाळी सात वाजेपर्यंत मुसळधार सुरू आहे.

Hatnur Dam water release : हतनूरचे ३२ दरवाजे उघडले; तापीकाठी ७० हजारांवर क्युसेकने पाण्याचा विसर्ग
Hatnur dam water level : हतनूरचे २२ दरवाजे १ मीटरने उघडले; तापी नदीकाठच्या गावांना हायअलर्ट

धरणांची आजची ताजी आकडेवारी (३१ जुलै, सकाळी ६ वाजता)

  • हतनूर धरण प्रकल्प

एकूण पाणीसाठा: २७७.५० द.ल.घ.मी. (७१.५२%)

उपयुक्त साठा: १४४.५० द.ल.घ.मी. (५६.६६%)

सद्य जलपातळी: २११.९३० मीटर (पूर्ण पातळी: २१४.००० मी.)

नदीपात्रातील विसर्ग: ७०,०६५ क्युसेक (३२ दरवाजे १ मीटरने उघडे)

कालवा विसर्ग: २०० क्युसेक

पाऊस: आज ५ मिमी (एकूण: १७२ मिमी)

  • गिरणा धरण प्रकल्प

एकूण पाणीसाठा: ५८७.०६२ द.ल.घ.मी. (९५.९१%)

उपयुक्त साठा: ५०२.१६२ द.ल.घ.मी.

सद्य जलपातळी: ३९७.७५० मीटर (पूर्ण पातळी: ३९८.०७ मी.)

नवीन आवक (२४ तास): ३६२.८५ दशलक्ष घनफूट (१०.२८६ द.ल.घ.मी.)

विसर्ग status: सर्व दरवाजे व कालवे सध्या बंद

पाऊस: आज १६ मिमी (एकूण: ४०२ मिमी)

logo
Pudhari News
pudhari.news