Jalgaon Hatnur Dam | हतनूर धरणाचे २४ दरवाजे एक मीटरने उघडले; तापी नदीपात्रात ५२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, दिवसभरात पाणलोट क्षेत्रात २८ मिलिमीटर पावसाची नोंद
Hatnur dam water level
Hatnur dam water levelPudhari
Published on
Updated on

Hatnur Dam Gates Opened

जळगाव/भुसावळ : तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे हतनूर मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. परिणामी शनिवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजेपर्यंत धरणाचे २४ दरवाजे प्रत्येकी एक मीटरने उघडण्यात आले. तापी नदीपात्रात ५२ हजार ९०२ क्युसेक (१,४९८ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण पर्जन्यमान ७६ मिलिमीटरपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.

Hatnur dam water level
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात वरुणराजाची 'वक्रदृष्टी'; खरीप पेरण्यांचा खोळंबा, फक्त २३ टक्केच पेरणी पूर्ण

सध्या हतनूर धरणाची पाणीपातळी २१२.०४० मीटर असून धरणाची पूर्ण संचय पातळी २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण जलसाठा २८२.६० दशलक्ष घनमीटर (७२.८३ टक्के), तर उपयुक्त जलसाठा १४९.६० दशलक्ष घनमीटर (५८.६७ टक्के) इतका झाला आहे.

धरणातून तापी नदीपात्रात ५२ हजार ९०२ क्युसेक (१,४९८ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू असून कालव्यातून ३०० क्युसेक (८.५० क्युमेक्स) पाणी सोडण्यात येत आहे.

Hatnur dam water level
Jalgaon News | सहा महिन्यांतच सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डे; ड्रीम कन्स्ट्रक्शनच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news