Farmer News : जळगाव जिल्ह्यात आठ महिन्यांत 144 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

शासकीय मदतीसाठी अवघे 68 पात्र, तर 58 जण अपात्र
Farmer News
जळगावमध्ये जानेवारी ते जुलैदरम्यान 128 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन Pudhari File Photo
Published on
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा हा मुख्यतः राजकारणी, केळी, कापूस या सर्व गोष्टींसाठी राज्यात ओळखला जातो. मात्र यंदा पावसाने अवकाळी पाऊस आणि नंतर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत शेतकऱ्यांच्या जीवनयात्रा संपविण्याचा आकडा 144 वर गेला आहे.

जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची गावापासून ते दिल्लीपर्यंत त्याची चर्चा होते. परंतु याच जळगाव जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले असून, त्यांच्याकडे नेत्यांचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांमध्ये १४४ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जीवनयात्रा संपविले आहे. यामध्ये फेब्रुवारी, मार्च व जुलैत अनुक्रमे २३, २९, २३ अशा सर्वाधिक जीवनयात्रा संपविले आहेत.

jalgaon
farmer ended lifePudhari News Network
Farmer News
Eknath Khadse : सरकारकडून समाजात भांडण लावण्याचे काम

जळगाव जिल्ह्यात कापूस, मका, सोयाबीन, तूर, केळी, सूर्यफूल, गहू हे प्रमुख पीके आहेत. केळीचे दर गेल्या दीड वषापासून घसरल्याने केळी शेती तोट्याची ठरली आहे. कापसाचा दर पाच हजारांच्या आसपास रेंगाळल्याने यंदा कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. कापूस शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी ठरला. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे पुन्हा जीवनयात्रा संपविण्याचे चक्र वाढले आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदतीसाठी ६८ जीवनयात्रा संपविणारे शेतकरी पात्र ठरले आहे. तर ५८ अपात्र ठरलेले आहेत तर जुलै व ऑगस्टमधील १६ प्रकरणे अजूनही प्रलंबित आहे.

Farmer News
128 Farmers Ended Lives | जळगावमध्ये जानेवारी ते जुलैदरम्यान 128 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news