

जळगाव : जळगाव जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीत तब्बल १२८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणांपैकी केवळ ५९ शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीस पात्र ठरले असून २४ प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच ४५ प्रकरणांना मदतीस अपात्र ठरवण्यात आले आहे.
जानेवारी: १७
फेब्रुवारी: २३
मार्च: २९
एप्रिल: ८
मे: १३
जून: १६
जुलै: २२
खरीप हंगामाच्या सुरुवातीसच जीवनयात्रा संपविण्याचे प्रमाण वाढले असून मे महिना ते जुलै महिनादरम्यान ५१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याची नोंद आहे. यामागे कापसाला योग्य भाव न मिळणे, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती व इतर वैयक्तिक आर्थिक संकटे ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
पात्र प्रकरणे: ५९
अपात्र प्रकरणे: ४५
प्रलंबित प्रकरणे: २४
मार्च: १
जून: २
जुलै: २१
जिल्ह्यातील ही स्थिती अत्यंत गंभीर असून खरीप हंगामात शेतकऱ्यांची निराशा वाढल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. शासनाने वेळीच हस्तक्षेप करून योग्य तो मदतीचा हात पुढे न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.