

जळगाव : राज्यातील सरकार समाजा- समाजात भांडण लावण्याचे काम करत आहे. हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना आरक्षण मिळेल का? याबाबत साशंकता आहे. सरकार निष्क्रीय असून केवळ घोषणा करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीत ते बोलत होते.
खडसे म्हणाले की, केळी महामंडळाची पाच वेळा घोषणा झाली, त्याचे काय झाले, केळी चारशे रुपये क्विंटल झाली. कोणी बोलायला तयार नाही. -लेवा महामंडळाची घोषणा केली, कुठे आहे. मोर्चे काढणे विशेष नाही मात्र, त्या मोर्चामध्ये फक्त दहा ते बारा जण असतील तर त्याची नोंद कोणीच देत नाही मात्र त्या ठिकाणी हजार ते पंधराशे जर पदाधिकारी व कार्यकर्ते असतील त्याची नोंद नागरिक घेत असतात व त्याची प्रशासनही घेत असते निवडणुका जिंकण्याच्या आधी त्याची व्यवस्था ही केली पाहिजे. सरकारला कोणतेच प्रश्न सोडवायचे नाहीत. सरकार निष्क्रिय आहे. जिल्हा चार मंत्री असूनही केळीच्या प्रश्नावर कोणीच बोलण्यास तयार नाही असा आरोप त्यांनी केला.