जळगावमधील ६७ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर : अनिल पाटील

जळगावमधील ६७ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर : अनिल पाटील
Published on
Updated on

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :  जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती लागू होणार आहेत, अशी माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. मंत्रालयातील वॉर रूम येथे मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील जळगाव, भोकर, म्हसावाद, नशिराबाद, असोदा, पिंप्राळा महसूली मंडळामध्ये, तालुका जामनेर महसूली मंडळामध्ये जामनेर, पहुर, शेंदुर्णी, वाकडी, मालदाभाडी, नेरी, तोंडापूर महसूली मंडळामध्ये, तालुका एंरडोलमध्ये एरंडोल,उमरदे (रिंगणगाव), कासोदा, उत्राण महसूली मंडळामध्ये, तालुका धरणगावमध्ये धरणगाव, सोनवंद, पाळधी, पिंपरी खुर्द,साळवा, नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये, चांदसर तालुका भुसावळमध्ये भुसावळ, वरणगाव, कु-हे प्र.नृ,पिंपळगाव महसूली मंडळामध्ये, तालुका बोदवडमध्ये बोधवड,करंजी नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये, तालुका यावलमधील भालोद, किनगाव, साकळी, फैजपूर, बामणूद महसूली मंडळामध्ये, तालुका रावेळमधील खिरडी, निभोंरा बुद्रुक महसूली मंडळामध्ये, तालुका मुक्ताईनगरमधील मुक्ताईनगर, अंतुर्ली, घोडसगाव महसूली मंडळामध्ये, तालुका पाचोरामधील पाचोरा, नगरदेवळा, गाळण, पिंपळगाव हरेश्वर, कु-हाड, वरखेड बुद्रूक महसूली मंडळामध्ये, तालुका भडगांवमधील भडगांव, कांजगाव (गोंडगाव), आमडदे, कोळगाव महसूली मंडळामध्ये, तालुका अमळनेरमधील अमळनेर, पातोंडा, भरवस, मारवड, अंमळगाव, शिरूड, वावडे महसूली मंडळामध्ये,  तालुका चोपाडामधील चोपडा, आडावत, गोरगावल बु,चाहाडा, धानोरा प्र.य, लासुर महसूली मंडळामध्ये, तालुका पारोळामध्ये बहादरपुर, घोरवड, शेवाळे बुद्रुक महसूली मंडळामध्ये ही दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली. आगामी कालावधीतही दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेवून उर्वरीत भागासाठी निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

यावेळी या बैठकीला मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपानराव भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधानसचिव सोनिया सेठी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, कृषी विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिव वि.र.दहिफळे, पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news