Jalgaon Robbery | धरणगावात घरफोडी; कुलूप तोडून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

कृष्ण गीता नगर परिसरातील या घटनेमुळे खळबळ

Mayank Jewellers' Robbery Case Solved; But Sarafa directly suspects the police
Robbery News Pudhari File Photo
Published on
Updated on

Theft in locked house Dharangaon

जळगाव : धरणगाव शहरात चोरट्यांनी पुन्हा सक्रिय होत बंद घर फोडून सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्ण गीता नगर परिसरातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण प्रल्हाद विसपुते (वय ४५, रा. प्लॉट क्र. १०, कृष्ण गीता नगर) या आपल्या कुटुंबासह नाशिक येथे विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी ७ मार्चरोजी रात्री ११ ते ८ मार्च रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाचे लॉकर तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.


Mayank Jewellers' Robbery Case Solved; But Sarafa directly suspects the police
Jalgaon Robbery | रावेर पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक': ८ लाखांच्या लूटमारीतील ७ सराईत जेरबंद; मुख्य सूत्रधार 'हसन फावड्या' अद्याप फरार

चोरट्यांनी कपाटातील ७ ग्रॅमची सोन्याची माळ (२१ हजार रुपये), १० ग्रॅमची सोन्याची चैन (३० हजार रुपये), ३० ग्रॅमचा ‘राणीहार’ (९० हजार रुपये), १० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस (३० हजार रुपये), ८ ग्रॅमचे झुमके (२४ हजार रुपये) आणि १० ग्रॅमची ठुसी (३० हजार रुपये) असे दागिने तसेच ५०० रुपयांच्या नोटांमधील ४५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

८ मार्च रोजी विसपुते कुटुंब घरी परतल्यानंतर घरातील कुलूप तुटलेले व कपाटातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आले. त्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Mayank Jewellers' Robbery Case Solved; But Sarafa directly suspects the police
Jalgaon robbery news | जळगावात वाईन शॉप फोडण्याचा प्लॅन फसला; कल्याणचा सराईत 'भामटा' एलसीबीच्या जाळ्यात!

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, शहरातील भरवस्तीत घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news