Criminal Arrest | परराज्यातील गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

गुजरात राज्यातील उमरा व नवसारी पोलीस स्थानकांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, चोरी, आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी भुसावळ येथे जाळ्यात पकडले.
Criminal Arrest
परराज्यातील गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात (Pudhari File Photo)
Published on
Updated on

जळगाव : गुजरात राज्यातील उमरा व नवसारी पोलीस स्थानकांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, चोरी, आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी भुसावळ येथे जाळ्यात पकडले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 19 रोजी निझर पोलीस स्टेशन, सुरत (गुजरात) यांचे कडुन समजले की, तापी व्यारा, सेशन कोर्ट केस नंबर- ४२/२०२४ दि.३०.९.२०२५, भादवि कलम-३९४,३९७,३४२,३२३,५०४,(२), ३४,१२०(ब), आर्म अॅक्ट २५ (१), जी पी अॅक्ट १३५ प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपी नामे साहील उर्फ सलीम पठान, वय-२१, रा-भाटीया गावं, हाजीपुरा, सचीन, जि-सुरत (गुजरात) हा जळगांव जिल्हयात आल्या बाबत कळविले होते.

Criminal Arrest
Jalgaon Accident : बेपत्ता मुलाची पोलिसांत तक्रार दिल्यानंतर धक्कादायक माहिती समोर, नातेवाईकांचा उडाला थरकाप

या आरोपी बाबत वरिष्ठ पोलीस निरिक्षक. राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन भुसावळ उपविभागातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 19 रोजी आरोपीतास भुसावळ शहरात नहाटा चौफुलीजवळील हायवेवर या ठिकाणी सापळा रचुन ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, चोरी, आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

Criminal Arrest
Jalgaon Youth Death | 'पत्नी नांदायला येत नाही', पोलीस स्टेशनसमोरच पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधिक्षक, अशोक नखाते, तसेच उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक, राहुल गायकवाड, स्थागुशा जळगांव, शरद बागल, श्रे. रवि नरवाडे, गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे अशांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news