मुख्यमंत्री संभ्रमात..! 'मुक्ताईनगर' यावे लागले तीन वेळा : एकनाथ खडसे

मुख्यमंत्र्यांवर खडसेंची टिका
Eknath Khadse
मुख्यमंत्र्यांवर खडसेंची टिकाfile photo
Published on
Updated on

जळगाव : राज्याचे व महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना मुक्ताईनगर तीन वेळा यावे लागते, म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा मतदार संघ कमकुवत आहे. उमेदवार आहे मात्र तो कोणत्या पक्षाचा आहे? कोणत्या चिन्हावर मतदान करायचे आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही. मुख्यमंत्रीच अजूनही संभ्रमात आहेत, असे महायुतीचे उमेदवार आहेत कोणत्या पक्षाकडून आहे ते माहित नाही एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले. उमेदवार हा शिवसेनेचा आहे की भाजपाचा आहे काही दिवसांपूर्वीच ते अपक्ष असल्याचे म्हणत होते. मात्र तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठबळावर अपक्ष आमदार म्हणून विजयी झालेल्या आहात असे वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

Eknath Khadse
जळगाव : मतदान पेट्या तालुक्याला रवाना

मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजय करायचे असे आव्हान केलेले. तो कोणत्या पक्षाकडून किंवा कोणत्या चिन्हावर लढणार आहे. कोणत्या चिन्हावर मतदान करावे मुख्यमंत्रीच संभ्रमात आहे. ते कोणत्या पक्षाचे आहे हे स्पष्ट करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्याचे मात्र ते करू शकले नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये विविध योजनांचे पाढे वाचले व त्या योजनाचा एका शब्दात उल्लेख केला. लाडक्या बहिणीचा त्यांनी भरभरून कौतुक केले मात्र त्यांनी आपल्या भाषणात वाढलेल्या महागाई बद्दल ती कशी कमी होईल यावर एकही शब्द बोलले नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाहीये. त्यावर इथे बोललेले शेतकरी जीवन संपवत आहेत. त्यावरही त्यांनी काहीच बोलले नाही या महागाईचे ही कौतुक केले असते तर बरं झालं असतं ज्याप्रमाणे ते लाडक्या बहिणीचे कौतुक राज्यभर करीत असल्याचा टोला खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना करतोय ना भाऊ लगावला.

Eknath Khadse
गणेश विसर्जना बरोबर भाजपाचा प्रवेश विसर्जित : एकनाथराव खडसे

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकरी शेतमजूर किंवा सर्वसामान्य जो या महागाईमध्ये होरपळतोय त्याच्याशी काही घेणे देणे नसल्याचे वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केले. शेतीमालाला भाव नाही वाढती महागाई यावर काही भाष्य करायचे नाही, मात्र आपला राजकारणाचा उल्लू शिधा करण्यासाठी काहीतरी लोनकडी थाप मारायची आणि आपला उल्लू शिधा करायचा. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की 5000 कोटीची कामे केले मात्र 5000 कोटीची कामे या मतदारसंघात केली कुठे! हा पैसा भ्रष्टाचारात तर नाही गेला ना काम न करता बिले दिले तर नाही काढले ना याचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला. कोणत्याही योजना सुरू झाल्या त्या बंद होत नाही हे सरकार आधीच दिवाळ खोर झाले आहे. आठ लाख कोटीचे कर्ज या सरकारवर आहे. अधिक कर्ज काढा आणि योजना द्या माझ्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. लाडक्या बहिणी योजनेला आमचा आक्षेप नाही आमचा आक्षेप वाढत्या महागाईला व शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीये त्याला आहे असे वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news