जळगाव : मतदान पेट्या तालुक्याला रवाना

जिल्हाधिकाऱ्यांची तालुक्यावर आढावा बैठक
जळगाव
मतदान केंद्रावरील यंत्रणेची पाहणी करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (छाया : नरेंद्र पाटील)
Published on
Updated on

जळगाव : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर अधिकारी व प्रशासन कामाला लागले आहेत. विधानसभेकरीता भुसावळ येथून सोमवार (दि.21) प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वोटिंग मशीन एसटीद्वारे पाठवण्यात आल्या. भुसावळ, रावेर या ठिकाणी निवडणुकीचा आढावा घेऊन त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा व ही वाहने सीमारेषा आदींची पाहणी करून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवार (दि.21) आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास भुसावळ येथे प्रांत कार्यालय या ठिकाणी निवडणुकीची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार लीना लबडे, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे हे उपस्थित होते.

बैठकीप्रसंगी नामनिर्देशन पत्र भरण्यात येणाऱ्या परिसराची 100 मीटर रेषापर्यंत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व कडक बंदोबस्त करण्यात आला. नामनिर्देशन पत्र व इतर कागदपत्र तपासणीसाठी लावण्यात आलेले टेबल आदींची पाहणी करून सुचना करण्यात आल्या. मतदान केंद्रावर उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या. उमेदवारांनी वाहने आणली असता त्यांना पार्किंगची जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर रावेर या ठिकाणी देखील निवडणुक आढावा बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. सकाळपासूनच भुसावळ येथील कार्यालयातून अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये वोटिंग मशीन टेस्टींगद्वारे त्या त्या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत. संपूर्ण यंत्रणा तपासणी करण्यात येऊन विधानसभा क्षेत्राच्या ठिकाणी पाठविण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news