जळगाव : गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे फडणवीस यांनी सांगितले होते, मात्र आता माझा भाजप मधला प्रवेश गणेश विसर्जना बरोबरच विसर्जित झालेला आहे. असे वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी जामनेर येथील राष्ट्रवादीच्या सभेपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. जामनेर येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेपूर्वी पत्रकारांशी बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले की, जामनेर मध्ये माझ्या यापूर्वी सभा झालेले आहेत त्या सभांना मोठा प्रतिसाद नागरिकांचा मिळालेला आहे. व आजही तुम्ही बघत आहात की मोठ्या प्रमाणात नागरिक सभेसाठी उपस्थित झालेले आहेत. भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गटात प्रवेश करत आहेत. मोठी गर्दी आणि प्रतिसाद त्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा उमेदवार विजयी होईल, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. असे खडसे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारांमध्ये मी सहभागी झालो आहे, असे एकनाथ सांगत खडसे यांनी यावेळी त्यांची भूमिका स्पष्ट केली.