SAF Project Chalisgaon | चाळीसगावात १५ हजार कोटींच्या SAF महाप्रकल्प साकारणार : दावोस येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करार

Jalgaon News | ऊस, मका, कापूस, बांबू आदी शेती अवशेषांपासून तयार होणार विमानांचे हरित इंधन
Devendra Fadnavis Davos Visit
Devendra Fadnavis Davos Visit Pudhari
Published on
Updated on

Devendra Fadnavis Davos Visit

चाळीसगाव : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला आणि हरित ऊर्जेच्या भविष्याला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण स्वित्झर्लंडमधील दावोस येथे घडला आहे. जागतिक आर्थिक परिषद (World Economic Forum – WEF) 2026 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने चाळीसगाव तालुक्यात सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या Sustainable Aviation Fuel (SAF) महाप्रकल्पासाठी सामंजस्य करार केला आहे.

हा करार अमेरिका स्थित सॅन फ्रान्सिस्को येथील ACTUAL HQ या कंपनीसोबत करण्यात आला असून, शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरले जाणारे हरित इंधन तयार करणारा हा देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाचा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे चाळीसगाव तालुका औद्योगिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे.

Devendra Fadnavis Davos Visit
Jalgaon Burglary | जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा 'सुळसुळाट': एकाच दिवसात ३ घरफोड्या; पोलिसांचा 'कागदी' पहारा!

या करारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार मंगेश चव्हाण, ACTUAL HQ चे सह-संस्थापक व अध्यक्ष डॉ. कार्तिक बालकृष्णन, Strategic Origination विभागाच्या प्रमुख ऑरोरा चिस्टे यांच्यासह Sankla Renewables आणि SCUBE Infra चे प्रतिनिधी उपस्थित होते.

हा प्रकल्प ACTUAL HQ, Sankla Renewables आणि SCUBE Infra यांच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या सुमारे २००० एकरांच्या Sustainable Industrial Zone चा भाग आहे. पुणेस्थित Sankla Group ला औद्योगिक व बांधकाम क्षेत्रातील ३० वर्षांहून अधिक अनुभव असून, स्वच्छ ऊर्जा, जैवइंधन आणि शाश्वत औद्योगिक विकासावर कंपनीचा विशेष भर आहे.

Devendra Fadnavis Davos Visit
Jalgaon Mayor Election | जळगाव महापौरपदासाठी भाजपमधील ९ रणरागिणीमध्ये चुरस : आ. भोळे, आ. चव्हाण यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

या महाप्रकल्पांतर्गत चाळीसगाव येथे अंदाजे १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, ऊस पाचट, कापूस काड, सोयाबीन भूसा, तूर काड, बांबू व अन्य कृषी अवशेषांपासून आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने Sustainable Aviation Fuel (SAF) तयार केले जाणार आहे. हा प्रकल्प २०२९ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

संपूर्ण प्रकल्प १०० टक्के नवीकरणीय ऊर्जेवर आधारित असणार असून, BESS सह २४x७ वीजपुरवठा, १०० टक्के पाणी पुनर्वापर, EV ट्रकद्वारे वाहतूक आणि ESG (Environment, Social, Governance) निकषांचे पूर्ण पालन केले जाणार आहे.

Devendra Fadnavis Davos Visit
Jalgaon PHC | जळगाव जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा राज्यस्तरीय गौरव : ८ आरोग्य उपकेंद्रांना NQAS नामांकन

चाळीसगावच का?

मुंबई–आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे चाळीसगावची भौगोलिक व लॉजिस्टिक क्षमता या प्रकल्पासाठी अत्यंत अनुकूल ठरली आहे.

या प्रकल्पातून ३,००० हून अधिक थेट रोजगार निर्माण होणार असून, शेतकरी, वाहतूक, सेवा क्षेत्र आणि पुरवठा साखळीमधून हजारो अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील. स्थानिक तरुणांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार असून, FPO च्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून दीर्घकालीन कराराने कृषी अवशेष खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला स्थैर्य मिळणार आहे.

भारत सरकारच्या SAF धोरणाशी आणि ICAO च्या CORSIA नियमांशी सुसंगत असलेला हा प्रकल्प २०७० नेट-झिरो उत्सर्जन उद्दिष्टांच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. पारंपरिक विमान इंधनाच्या तुलनेत SAF मुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे ८० टक्के घट होणार आहे.

करारानंतर प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, आजचा दिवस चाळीसगाव मतदारसंघासाठी ऐतिहासिक आहे. जागतिक उद्योग पटलावर चाळीसगावचे नाव प्रथमच आले असून त्याचा मला अभिमान आहे. सिंचन, रस्ते, दळणवळणासोबतच उद्योग, रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले.

Devendra Fadnavis Davos Visit
Jalgaon Politics : भाजपचा नाशिकमध्ये 'यल्गार'! गटनेतेपदी प्रकाश बालानी तर नितीन बरडेंना 'बढती'

ACTUAL HQ चे अध्यक्ष डॉ. कार्तिक बालकृष्णन व ऑरोरा चिस्टे यांनी सांगितले की, भारताला SAF उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याचा आमचा संकल्प आहे. चाळीसगावमधील हा प्रकल्प शाश्वत व जागतिक दर्जाचा ठरेल आणि महाराष्ट्राला SAF क्षेत्रात आघाडीवर नेईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news