Caste Certificate Invalid | भुसावळ येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का: नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध

भुसावळ नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्षपद अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव
Fake Caste Certificate
Fake Caste CertificatePudhari
Published on
Updated on

Bhusawal Municipal Council

जळगाव : भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा महत्वाचा निकाल जळगाव येथील जात पडताळणी समितीने दिला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भुसावळ नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्षपद ही अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने गायत्री चेतन भंगाळे यांनी निवडणूक लढवून यात विजय संपादन केला होता. त्यांनी निवडणूक अर्जासोबत एस.सी. प्रवर्गाचे भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रमाणपत्र आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडले होते.

Fake Caste Certificate
Bhusawal Crime | वराडसीम येथे माय-लेकावर लाकडी दांडक्याने हल्ला; ठार मारण्याची धमकी

नियमानुसार, निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत गायत्री भंगाळे यांना जात वैधता समितीकडून व्हॅलीडीटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. तथापि, ही मुदत उलटण्याआधीच त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय देण्यात आला आहे.

जळगाव येतील जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा नयना बोदर्डे, सदस्य एन.एस. रावते आणि एस.एस. महाजन यांच्या समितीने गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र हे अनुसूचित प्रवर्गातील नसल्याचे कारण देत त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. प्रमोद सावकारे, रजनी संजय सावकारे, संजय तायडे आणि राहुल तायडे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यात भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांवर कारवाई देखील प्रस्तावित करण्यात आली आहे.

Fake Caste Certificate
Bhusawal Crime | मस्करीचा जाब विचारला अन् थेट पोटावर वार! कन्हाळा येथे खळबळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

गायत्री भंगाळे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी पुढे नेमके काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news