Bhusawal Crime | वराडसीम येथे माय-लेकावर लाकडी दांडक्याने हल्ला; ठार मारण्याची धमकी

भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे घराबाहेर बोलावून एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
 Crime News
Crime News Pudhari
Published on
Updated on

Youth Attacked Varadsim Bhusawal

जळगाव : भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे घराबाहेर बोलावून एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय वृद्ध मातेवरही आरोपींनी हल्ला चढवत हाताला दुखापत केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंगणात घुसून घातला धिंगाणा

आशाबाई शामराव सोनवणे (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपी रमेश तुकाराम शिंदे, राणा रमेश शिंदे, जयवीर रमेश शिंदे आणि सालदार कृष्णा (पूर्ण नाव माहीत नाही) हे त्यांच्या घराबाहेर आले. त्यांनी आशाबाईंचा मुलगा श्रीकांत याला घराबाहेर बोलावून लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली.

 Crime News
Bhusawal Crime | मस्करीचा जाब विचारला अन् थेट पोटावर वार! कन्हाळा येथे खळबळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

माय-लेक जखमी

मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून आशाबाई त्याला सोडवण्यासाठी धावून गेल्या. यावेळी आरोपी राणा शिंदे याने आशाबाईंच्या डोक्यात दांडका मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो वार हातावर झेलल्याने त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. आरोपींनी यावेळी माय-लेकाला जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास बाविस्कर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news