Bhusawal Crime | मस्करीचा जाब विचारला अन् थेट पोटावर वार! कन्हाळा येथे खळबळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा खुर्द येथे मस्करी केल्याचा जाब विचारणे एका मजुराला चांगलेच महागात पडले
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Labourer Attacked Jalgaon Bhusawal

जळगाव : भुसावळ तालुक्यातील कन्हाळा खुर्द येथे मस्करी केल्याचा जाब विचारणे एका मजुराला चांगलेच महागात पडले. आरोपींनी मजुराची मस्करी केल्यानंतर त्याने जाब विचारला असता, संतापलेल्या पाच जणांच्या टोळकीने त्याला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, टोळकीतील एकाने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या पोटावर आणि छातीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सलीम चांदखां गवळी (वय ४९, रा. कन्हाळा) हे दि. १९ एप्रिल रोजी रात्री ९.३० च्या सुमारास गावाच्या पुलाजवळून जात असताना आरोपींनी त्यांची मस्करी केली. सलीम यांनी "माझी मस्करी का करता?" असा जाब विचारला. याचा राग आल्याने जावेद रहीम गवळी, अनवर रहिमान गवळी, अशफक रहमान गवळी, मोसीन रहिम गवळी आणि रहिम गवळी (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

Crime News
Bhusawal Crime | भुसावळात भोपाळमधील सराईत गुन्हेगाराला अटक; गावठी पिस्तूल जप्त

पकडून ठेवून केला वार

मारहाणीदरम्यान अनवर आणि अशफक या दोघांनी सलीम यांना घट्ट पकडून ठेवले, तर जावेद गवळी याने आपल्या जवळील धारदार वस्तूने सलीम यांच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात सलीम गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध बीएनएस कलम १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ११८(१), ११५(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुमन तडवी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news