Bhusawal Nagar Palika Election Result 2025 : नगरसेवक भाजपचे; पण मालक 'तुतारी'चा

भाजपचे २७ नगरसेवक निवडून येऊनही नगराध्यक्षपद निसटले
Bhusawal Nagar Palika Election Result 2025 : नगरसेवक भाजपचे; पण मालक 'तुतारी'चा
Published on
Updated on

Bhusawal Nagar Palika Election Result 2025

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

राजकारणात 'वेळ' कुणाला कधी आणि कशी धोबीपछाड देईल याचा नेम नसतो, याचा प्रत्यय भुसावळ नगरपालिकेच्या निकालाने दिला आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत, भाजपने नगरसेवक पदावर निर्विवाद वर्चस्व मिळवले असले, तरी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत मात्र सावकारांच्या पत्नी रजनी सावकारे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या रणनीतीने मंत्र्यांच्या गडाला खिंडार पाडले असून, भुसावळच्या राजकारणात 'गुरू'ने 'शिष्या'ला राजकीय धडा शिकवल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

शेवटच्या क्षणी बदललेली समीकरणे

निवडणुकीच्या सुरुवातीलाच साक्षात मुख्यमंत्र्यांची तोफ भुसावळात धडकली होती. यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. पडद्यामागून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि माजी आमदारांच्या गटबाजीने आपली चाल खेळली. प्रचाराचे नियोजन आणि शेवटच्या क्षणी बदललेली समीकरणे भाजपसाठी धक्‍कादायक ठरली.

Bhusawal Nagar Palika Election Result 2025 : नगरसेवक भाजपचे; पण मालक 'तुतारी'चा
Panhala Nagar Parishad Election Results 2025: पन्हाळ्यात मोठी उलथापालथ; माजी नगराध्यक्षांचे पती अवघ्या सहा मतांनी पराभूत

काय चुकले सावकारांचे गणित?

भाजपच्या स्थानिक नेत्यांना आणि मंत्र्यांना विजयाची खात्री इतकी होती की, मतदारांच्या नाराजीकडे दुर्लक्ष झाले. अनेक विद्यमान आणि जुन्या नगरसेवकांचे पत्ते कट केल्याने पक्षात अंतर्गत धुसफूस होती. ज्यांचे तिकीट कापले गेले, त्यांनी आपल्या प्रभागापुरते वर्चस्व राखून 'नगराध्यक्ष' पदाच्या मतदानात हात आखडता घेतल्याची जोरदार चर्चा आहे. नगरसेवक पदाच्या २७ जागा जिंकूनही नगराध्यक्ष १८०० मतांनी पराभूत होणे, हे 'क्रॉस व्होटिंग'कडे अंगुलीनिर्देश करते.

Bhusawal Nagar Palika Election Result 2025 : नगरसेवक भाजपचे; पण मालक 'तुतारी'चा
Nagar Parishad Election Results | भाजप 'नंबर वन' राहिल : निकालाआधीच विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक भाकीत

माजी आमदारांनी सावकारांना रोखले

एकेकाळी माजी आमदार संतोष चौधरी यांचे पीए म्हणून राजकीय प्रवास सुरू करणारे संजय सावकारे आज राज्याचे मंत्री आहेत. मात्र, भुसावळ पालिकेच्या रणांगणात त्याच माजी आमदारांनी आपल्या 'किंगमेकर' भूमिकेतून सावकारांना रोखले. २७ नगरसेवक भाजपचे असूनही नगराध्यक्ष तुतारीचा (राष्ट्रवादी शरद पवार गट) झाला. भुसावळात भाजपचे 'कमळ' तर फुलले, पण त्याचा 'सुगंध' मात्र राष्ट्रवादीने पळवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news