

पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. यामध्ये माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल यांचे पती जनसुराज्यचे पक्षाचे रवींद्र धडेल यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. अवघ्या 6 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. अपक्ष उमेदवार महेश भाडेकर हे विजयी झाले आहेत.
जिल्ह्यातील नेत्यांनी स्थानिक पातळीवर आघाड्या करत राज्यातील आपल्याच सहकाऱ्यांना अनेक ठिकाणी आव्हान देत एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता, यामुळे नगर परिषद व नगर पंचायतीवर कोणत्या स्थानिक आघाडीचा झेंडा फडकणार, त्यातूनच जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच आता निकाल हाती येत आहेत.