भुसावळ ६६० मेगावाट क्षमतेचा वीज संच यशस्वीरीत्या कार्यान्वित

भुसावळ ६६० मेगावाट क्षमतेचा वीज संच यशस्वीरीत्या कार्यान्वित
Published on
Updated on

जळगांव : पुढारी वृत्तसेवा- आजचे यश हा केवळ एक टप्पा असून हा वीज प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणे गरजेचे असून येणारा प्रत्येक दिवस पूर्ण क्षमतेने काम करणे गरजेचे असल्याचे व त्याकरिता आवश्यक ते सहकार्य मुख्यालय करेल असे महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी आवाहन केले. ते भुसावळ येथील दीपनगर प्रकल्प भेटी दरम्यान आढावा बैठकीत बोलत होते.

महानिर्मितीच्या दीपनगर भुसावळ येथील १x६६० मेगावाट स्थापित क्षमतेचा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित संच क्रमांक ६ चे १७ जानेवारी २०२४ रोजी रात्री १ वाजून ३९ मिनिटांनी महनिर्मितीचे संचालक(प्रकल्प) अभय हरणे यांचे शुभहस्ते कळ दाबून यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला. सर्व संयंत्र सुरळीत सुरू असल्याची खात्री करून संच प्रायोगिक तत्वावर ४३ मेगावाट वीज उत्पादनासह ग्रीडला जोडण्यात यश आले, त्या ऐतिहासिक क्षणाची प्रत्येकाला उत्सुकता होती.

संच यशस्वीरीत्या कार्यान्वित झाल्याबद्दल महनिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन हे संबंधीतांचे अभिनंदन करण्यासाठी भुसावळ प्रकल्पात दाखल झाले आणि त्यांनी ५०० मेगावाट, कोळसा हाताळणी विभाग, ६६० मेगावाट प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट दिली, आढावा घेतला व प्रकल्प कामांना अधिक गती देण्याचे निर्देश दिले. प्रकल्प संबंधित अभियंते- कर्मचारी यांचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे हस्ते गौरव करण्यात आला. संच कार्यान्वित प्रसंगाची क्षणचित्रे आकर्षक आणि रंजक शिर्षकांसह जनसंपर्क विभागातर्फे प्रदर्शित करण्यात आली. तसेच परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या "ऊर्जामूठ" शिल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महनिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन आणि प्रकल्प चमूचे अभिनंदन केले.

याप्रसंगी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(प्रकल्प) पंकज नागदेवते, कार्यकारी संचालक(संवसु -१) राजेश पाटील, मुख्य अभियंते विवेक रोकडे,मोहन आव्हाड, विजया बोरकर, दत्तात्रय साळुंखे, संजय कुऱ्हाडे भेल कंपनीचे कार्यकारी संचालक संजीव रॉय, महाव्यवस्थापक दिनेश जवादे, तसेच महनिर्मिती, भेल च्या संबंधित एजन्सीजचे तज्ज्ञ अधिकारी-अभियंते प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून हा संच माहे मार्च २०२४ मध्ये पूर्ण क्षमतेने वाणिज्यिक तत्वावर वीज उत्पादन करेल असे डॉ.पी.अनबलगन यांनी सांगितले.

फ्ल्यू गॅस डी-सल्फारायझेशन युनिटसह सूरू होणारा महानिर्मितीचा हा पहिला संच आहे. या प्रकल्पामुळे परिसरात सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत विकासकामे सुरू आहेत. उद्योगधंदे वाढीस चालना तसेच प्रकल्पबाधित गावातील २०० व्यक्तींना मानधनासह प्रशिक्षण योजना लवकरच सुरू करण्यात येणार आहे. संच क्रमांक ६ चे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम मेसर्स भेल कंपनीने केले आहे.

सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प असल्याने कोळसा आणि पाणी सब क्रिटिकल तंत्रज्ञानाच्या तुलनेत कमी लागणार आहे. परिणामी विजेचा अस्थिर आकार कमी राहणार आहे. प्रकल्पामधून उत्सर्जित होणाऱ्या Sox /NOx ह्या वायूंचे प्रमाण प्रचलित पर्यावरणीय निकषांपेक्षा कमी राहणार असून पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे. सूत्रसंचालन हर्षद दाते आणि संतोष पुरोहित यांनी केले.

याप्रसंगी उप मुख्य अभियंते सोनकुसरे, अशोक भगत, संतोष वकारे, प्रशांत लोटके, मनोहर तायडे, अधीक्षक अभियंते महेश महाजन,किशोर शिरभैय्ये, मनिष बेडेकर,योगेश इंगळे,अशोक भगत, सुमेध मेश्राम,सुनील पांढरपट्टे, गिरीश ढोक, संतोष डगळे, नितीन कांबळे, महेंद्र पचलोरे,अतुल पवार, एस. एस. देशपांडे, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ राजेश चिव्हाणे,कल्याण अधिकारी पंकज सनेर, सुधाकर वासुदेव प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news