Jalgaon Crime | मेहुणबारेत राजकारणाचा 'खूनी खेळ': सरपंच-उपसरपंचांना चिरडण्याचा कट; 'सुपारी' देऊन घातपात

चाळीसगाव तालुक्यातील दस्तकेवाडी येथील घटना, अपघाताचा बनाव पडला अंगलट; चौघांना बेड्या
Sarpanch Deputy Sarpanch Attempted Murder
मेहुणबारे पोलिसांनी चौघांना अटक केली Pudhari
Published on
Updated on

Sarpanch Deputy Sarpanch Attempted Murder

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील दस्तकेवाडी येथील सरपंच आणि उपसरपंच या दोघांचाही काटा काढण्यासाठी रचलेला अपघाताचा बनाव मेहुणबारे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. केवळ राजकीय वर्चस्व आणि जुन्या वादातून या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या अंगावर पिकअप गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाचे चक्र फिरवत या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह चौघांना जेरबंद केले असून, अपघाताच्या गुन्ह्याचे रूपांतर आता थेट 'खुनाच्या प्रयत्नात' झाले आहे.

२६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच रात्रीच्या वेळी हा खूनी खेळ खेळला गेला. दस्तकेवाडीचे सरपंच भगवान उत्तम देवरे आणि उपसरपंच ईश्वर ऊर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे हे दोघे आपल्या बुलेट मोटारसायकलने चाळीसगावहून गावाकडे जात होते. शिरवाडे शिवारात मेहुणबारे ते शिरवाडे रस्त्यावर समोरून येणाऱ्या एका भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या बुलेटला जाणीवपूर्वक जोरदार धडक दिली. या धडकेत सरपंच देवरे गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला हा सामान्य रस्ता अपघात असल्याचे भासवले गेले.

Sarpanch Deputy Sarpanch Attempted Murder
Jalgaon crime news | गांजा तस्करांची ‘नशा’ उतरवली; एलसीबी अन् पहूर पोलिसांचा थरार

या घटनेत उपसरपंच ईश्वर अहिरे यांना घातपाताचा दाट संशय आला. त्यांनी पोलीस प्रशासनाकडे दाद मागितल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि डीवायएसपी विजयकुमार ठाकूरबाड यांनी तपासाचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण सुरू केले. तपासात असे आढळून आले की, एक पिकअप वाहन बराच वेळ या दोघांचा पाठलाग करत होते.

पोलिसांनी संशयास्पद पिकअप वाहनाचा मालक लक्ष्मण अशोक महाजन याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला. त्यावेळी त्याने या घटनेचा धक्कादायक खुलासा केला. दस्तकेवाडी गावातील राजकीय मतभेदातून सरपंच आणि उपसरपंचांना कायमचे वाटेतून बाजूला काढण्यासाठी भिमराव रोकडे आणि इतरांनी हा कट रचल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील सर्व मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या.

Sarpanch Deputy Sarpanch Attempted Murder
Jalgaon Crime News | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणाऱ्या 'पप्पू'च्या मुसक्या आवळल्या; 4 लाखांची कार जप्त

हे आहेत अटकेतील आरोपी:

१) भिमराव पांडुरंग रोकडे (रा. दस्तकेवाडी)

२) सचिन भिमराव रोकडे (रा. दस्तकेवाडी)

३) गोविंदा विठोबा माळी (रा. दस्तकेवाडी)

४) लक्ष्मण अशोक महाजन (पिकअप मालक, रा. वाडे, ता. भडगाव)

अपघाताचे कलम बाद, ३०७ लागू!

यापूर्वी मेहुणबारे पोलीस ठाण्यात केवळ अपघाताचा गुन्हा (कलम २८१, १२५ अ, ब) दाखल होता. मात्र, तपासानंतर पोलिसांनी हे कलम कमी करून आता 'फौजदारीपात्र कट रचून खुनाचा प्रयत्न' केल्याची गंभीर कलमे लावली आहेत. गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.

Sarpanch Deputy Sarpanch Attempted Murder
jalgaon crime news | हिंगोण्यात खळबळ: मैत्रीच्या वादातून तरुणाची हत्या

या पथकाने केली कामगिरी

ही यशस्वी कामगिरी सपोनि प्रवीण दातरे, पीएसआय सुहास आव्हाड, पीएसआय विकास शिरोळे, किशोर पाटील, शांताराम पवार, सचिन निकम, योगेश पाटील, विनोद बेलदार आणि संजय लाटे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय सुहास आव्हाड आणि संजय लाटे करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news