

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्यानंतर पतीने स्वत :ची जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील देऊळगाव येथे शुक्रवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास ही काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. याबाबत अधिक तपास फत्तेपूर पोलिसांकडून सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिभा झनके ह्या आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन जामनेर तालुक्यातील देऊळगाव येथे आपल्या माहेरी आल्या होत्या. आज (शुक्रवारी) पती विशाल झनके (रा. दुधलगाव, जि. बुलढाणा) हा देऊळगाव येथे आला. त्यानंतर त्याने रागाच्या भरात पत्नी प्रतिभा व दीड वर्षाची मुलगी दिव्या या दोघांचा गळा चिरून निर्घूण खून केला. त्यानंतर आपल्या गावाकडे जाऊन त्याने स्वत:ची जीवनयात्रा संपवली. ही घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास फत्तेपूर पोलीस ठाण्यातील सपोनि गणेश फंड करीत आहेत.
हेही वाचा :