जळगाव येथे २६ जूनपासून पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन; अध्‍यक्षपदी विजयराव देशमुख

जळगाव येथे २६ जूनपासून पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन; अध्‍यक्षपदी विजयराव देशमुख
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : यंदाचे २०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सार्थ त्रिशती वर्ष असून त्‍यानिमित्‍ताने २६ ते २९ जून दरम्यान जळगाव येथे विश्वातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अध्‍यक्षपद धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराज नावाने परिचित असलेले 'शककर्ते शिवराय' या विश्व प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक विजयराव देशमुख भूषविणार आहेत.

जळगाव येथे २६ जूनपासून पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सार्थ त्रिशती वर्ष
  •  जळगाव येथे २६ ते २९ जून दरम्यान विश्वातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन
  • विजयराव देशमुख भूषविणार अध्यक्षपद

चार दशकांपासून शिवचरित्राचे गाढे अभ्‍यासक व वक्‍ते असलेले शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी शिवचरित्राशी निगडीत असलेल्‍या शेकडो साधनांचे मूलग्राही अध्‍ययन केले असून त्‍यांनी 'शककर्ते शिवराय' हा द्विखंडात्‍मक शिवचरित्र लिहिलेले आहे.

शिवचरित्र सकारात्मक रीतीने पुढील पिढीस हस्तांतरित करावे, या उद्देशाने इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍या हस्‍ते होणार असून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज, तंजावरच्या गादीचे वारस श्रीमंत शिवाजी राजे भोसले आणि नागपूर गादीचे वारस श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शिवकाळातील छत्रपती शिवरायांचे सोबत असणारे ७५ सरदार घराण्यांचे वारसदार तसेच, शिवप्रेमी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहणार आहेत. यानिमित्ताने नाणे संग्रह, शस्‍त्रप्रदर्शन, पगडी प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, वीरगळ व आरमार प्रदर्शनासोबत गोंधळ, जागरण, पोवाडा,  शिवकालीन कलांचे सादरीकरण, संत साहित्‍य, शिवछत्रपतींचा राज्‍याभिषेक आदी विषयांवर परिसंवाद, मुलाखती, अभ्‍याससत्र असे भरगच्‍च कार्यक्रम होणार आहेत.

तरी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख, नियंत्रक रवींद्र पाटील (पाचोरा), इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारती साठे (यावल) यांनी केले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news