

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तस्करी रोखत सुमारे 50 लाखांचा गुटखा जप्त केला. कंटेनरमध्ये चॉकलेटचे खोके रचून त्याच्या आड गुटख्याची तस्करी सुरू होती.
बाजारपेठ पोलिसांनी कंटेनर (यूपी 78 सीएन 5698) मधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. रात्री 7.30 च्या सुमारास नाहाटा चौफुलीजवळ कंटेनर आल्यानंतर त्याची झडती घेतली असता, त्यात चॉकलेट बॉक्सच्या आड पानमसाल्याचा माल आढळला. हा कंटेनर जप्त करून पोलिस उपअधीक्षक कार्यालयात आणण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालक जगदीश श्रीवास्तव (48) यास अटक केली असून, त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल केला. अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा :