जळगाव : अपघातग्रस्त टँकरमधून तेल घेऊन जाताना नागरिक.
जळगाव : अपघातग्रस्त टँकरमधून तेल घेऊन जाताना नागरिक.

जळगाव : भुसावळला खाद्यतेलाचा टँकर उलटला; तेल घेण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

Published on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
खाद्यतेल घेऊन जाणार्‍या टँकरचा भुसावळ शहरात अपघात झाल्यानंतर नागरिकांची तेल घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती. शनिवारी गुजरातच्या हजरा येथून नागपूरकडे तेल घेऊन जाणारा टँकर (क्र. जीजे 12 बी, एक्स 9325) भुसावळ रोडवर कारला वाचविण्याच्या प्रयत्नात उलटला. यावेळी तेलाचा टँकर उलटल्याची वार्ता परिसरात कळताच नागरिकांनी येथे धाव घेत टँकरमधील सोयाबीन तेल लांबविले. यावेळी नागरिकांनी मोठमोठ्या कॅन आणि भांड्यांमध्ये तेल भरून नेले. सुदैवाने या अपघातात चालक दुर्गाराम गोगाराम जाट हा बचावला. मात्र, यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news