उद्योगमंत्री उदय सामंत : माळेगाव औद्योगिक वसाहतीचा लवकरच विस्तार

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना सीमा संघटनेचे पदाधिकारी. समवेत पालकमंत्री दादा भुसे.
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना सीमा संघटनेचे पदाधिकारी. समवेत पालकमंत्री दादा भुसे.

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी माळेगाव औद्योगिक वसाहतीतील टप्पा क्रमांक दोनवरील भूखंडावर पायाभूत सुविधा उभ्या करण्यासह वितरणाला गती देण्यासाठी ले आउटचे काम हाती घेण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकार्‍यांना दिल्या. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे यांच्यासह सीमा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष के. एल. राठी, सचिव बबनराव वाजे, उपाध्यक्ष किरण भंडारी, रतन पडवळ, स्टाइसचे चेअरमन नामकर्ण आवारे यांच्या सोबत विविधांगी चर्चा झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भूसंपादन महाव्यवस्थापक डॉ. संदीप आहेर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी नितीन गवळी, सहायक सचिव देगावकर आदींसह अधिकारी उपस्थित होते. वसाहतीचा विस्तार हाती घेण्यात आला आहे. त्याकरिता टप्पा क्रमांक दोन मध्ये 200 एकर भूखंडावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात, भूखंडाचे वितरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली. याबाबत अधिकार्‍यांना लेआउट करण्याच्या सूचना ना. सामंत यांनी दिल्या.

या मागण्यांना दिला सकारात्मक प्रतिसाद
औद्योगिक वसाहतीत मुख्य रस्ता चौपदरी करण्यात यावा, अशी मागणी बबनराव वाजे यांनी केली. सावंत यांनी ती मान्य केली. औद्योगिक वसाहतीतील कचरा व्यवस्थापन करण्याची मागणी होती. जिल्हाधिकार्‍यांना याबाबत लगेचच आदेश देण्यात आले.

एक हजार एकर भूसंपादनाची मागणी
मापरवाडीजवळ एक हजार एकर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत प्रस्तावित केली आहे. त्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू करून सुविधा निर्माण कराव्यात. भूखंडाचे वितरण करावे, अशी मागणी उद्योजकांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. उद्योजकांना पुरेशा दाबाने वीज उपलब्ध व्हावी याकरीता वसाहतीत 33/11 केव्हीए वीज उपकेंद्राकरीता प्लॉट उपलब्ध करून देण्यात यावा. वसाहतीत मुकुंद कारखान्याचा 42 एकर जागेवर प्लॉट तयार करून उद्योजकांना देण्यात यावेत अशी मागणी केली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news