नाशिकमधील ‘या’ सहा तालुक्यांत मुलींचा जन्मदर खालावला, दरहजार मुलांमागे ‘इतक्याच’ मुली

मुलींचा जन्मदर घसरला,www.pudhari.news
मुलींचा जन्मदर घसरला,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर खालावत चालल्याची धक्कादायक बाब जिल्हा गर्भलिंग निदान बैठकीतून समोर आले आहे. येवल्याचे चित्र भयावह असून, तेथे दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ८९६ इतका आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अभ्यास गठीत केली आहे. समितीचा अहवाल हाती आल्यानंतरच मुलींच्या घसरलेल्या जन्मदराची कारणे समोर येतील.

जागतिक पातळीवर मुलींच्या जन्मदर वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असताना देशात चित्र वेगळे आहे. लिंग गुणोत्तरात दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण कमी असल्याने शासनाने मुलींचे जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी बेटी बचाव बेटी पढाओसह विविध उपक्रम हाती घेातले आहे. त्यात मुलींना १२ वी पर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिले जाते. मात्र, शासनाच्या या उपाययोजनांना जिल्ह्यात तरी यश लाभत नसल्याचे तूर्तास पाहायला मिळते आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गर्भलिंग निदान समितीच्या बैठकीत ही बाब उजेडात आली.

सहा तालुक्यांमध्ये मुलींच्या जन्माचा दर घटला आहे. त्यामध्ये येवल्यासह सुरगाणा, निफाड, दिंडोरी, बागलाण आणि सिन्नरचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. विशेष म्हणजे पेठमध्ये हेच प्रमाण विरुद्ध असून, तेथे मुलींचा जन्मदर ११७४ असून, जिल्ह्याचा जन्मदर ९४४ इतका आहे. दरम्यान, सहाही तालुक्यांत मुलींच्या जन्माचा दर का खालावला याच्या अभ्यासासाठी समिती नेमली आहे. समितीत प्रत्येकी दोन तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. तसेच गरज भासल्यास समिती पोलिसांची मदत घेणार आहे. मार्चपर्यंत समिती या सर्व प्रकरणावर अभ्यास करून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे.

१००० मुलांमागे मुलींचे प्रमाण

तालुका व मुलींचा जन्मदर

येवला ८९६

सुरगाणा ९०४

निफाड ९०५

दिंडोरी ९०६

बागलाण ९१२

सिन्नर ९१६

नाशिक ९२२

कळवण ९२६

इगतपुरी ९३७

देवळा ९४७

नांदगाव ९४९

मालेगाव ९७७

त्र्यंबकेश्वर ९८०

चांदवड ९८९

पेठ             ११७४

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news