daydreaming : जगातील 20 कोटी लोक पाहतात दिवास्वप्नं!

daydreaming
daydreaming
Published on
Updated on

लंडन : काही लोकांना जागेपणीही स्वप्नं पाहायची सवय असते. दिवसाही कुठे तरी टक लावून अशा दिवास्वप्नात (daydreaming) हरवलेली माणसं आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यांची ही तंद्री म्हणजे एक विकार असू शकतो. एक सामान्य माणूस जागृत अवस्थेतील सुमारे 30 टक्के वेळ स्वप्नात वाया घालवतो. आपल्याभोवती एक प्रकारचे काल्पनिक जग विणून त्यात दीर्घकाळ मग्न राहणे, अशी सवय सर्वाधिक गंभीर आहे. मात्र, यापासून अनेक तोटे आहेत. जगातील वीस कोटींपेक्षाही अधिक लोकांना अशी दिवास्वप्नं पाहण्याची सवय असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

या सवयीमुळे माणूस कामामध्ये लक्ष केंद्रीत करू शकत नाही. विचारात जगणारी माणसं शाळा-कॉलेजात शिकताना एकाग्र राहत नाहीत, कार्यालयातील कामे वेळेवर पूर्ण करता येत नाहीत. सहसा, ज्या कामांमध्ये जास्त एकाग्रतेची आवश्यकता नसते. जसे की, कपडे धुणे किंवा स्वच्छता करणे, अशा कामांत आपण दिवास्वप्न (daydreaming) पाहतो. ब्रिटनमधील एका नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, दीर्घकाळ दिवास्वप्न पाहणे ही एक धोकादायक स्थिती आहे, जी वाढत आहे. जितके लोक चिंताग्रस्त होऊ लागतात तितकेच ते विचारांमध्ये बुडू लागतात.

संशोधनात सहभागी असलेल्या ससेक्स युनिव्हर्सिटीच्या सहयोगी प्राध्यापिका ज्युलिया पोरियो म्हणतात, जगभरातील 2.5 टक्के लोक म्हणजे 20 कोटी लोक दिवास्वप्नं पाहत आहेत. याला 'मॅलडाप्टिव्ह डे-ड्रीमिंग' असे म्हटले जाते. या अवस्थेत लोक तासन्तास विचारात मग्न राहतात. दुसर्‍या अभ्यासातून असे दिसून आले आहे की दिवसा स्वप्ने (daydreaming) पाहणारे लोक त्यांचे झोपेचे निम्मे तास दिवास्वप्न पाहण्यात घालवतात. ते त्यांच्या समस्यांवर उपाय त्यांच्या विचारांमध्ये शोधतात. ते आपली जबाबदारी टाळू लागतात. कुटुंबातील नाती कमकुवत होऊ लागतात.

दिवास्वप्न पाहणे हे इतर अनेक आजारांना जन्म देत आहे. यामुळे एडीएचडी, चिंता, नैराश्य आणि ओसीडी होत आहेत. असे नाही की दिवास्वप्न (daydreaming) पाहण्याचे फक्त तोटेच आहेत. काही प्रमाणात त्याचे फायदेही आहेत. जर ते एखाद्या औषधाप्रमाणे अतिशक्ती देत नसेल तर ते तणाव दूर करण्यास मदत करते. संशोधनात असे दिसून आले आहे की ते एकाकीपणासाठी वरदान आहे आणि कंटाळा दूर करते. समस्या सोडवण्यास मदत होते. कधीकधी सर्जनशीलता वाढते. अपघात किंवा मोठ्या आघातामुळे झालेल्या धक्क्यातून सावरतो. दिवास्वप्न पाहून एखादी व्यक्ती स्वतःला काही काळ विस्मरणात ठेवू शकते. यामुळे अनेक गोष्टी विसरण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news