नाशिकमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग, परिसरात धुराचे लोट

नाशिकमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग, परिसरात धुराचे लोट

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी, वडनेर दुमाला रोड राजपूत कॉलनी येथे आज गुरुवार (दि. 3) पहाटे चारच्या सुमारास प्लास्टिक व भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. शहरातील विविध ठिकाणाचे ९ अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल असून आग विझविण्याचे काम नियंत्रणात आले आहे.

आज पहाटेच्या सुमारास या गोडाऊनला आग लागली. माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला तसेच अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. या नंतर सिडको नाशिक नाशिकरोड अंबड औद्योगिक वसाहत या भागातील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या ठिकाणी अनधिकृत भंगार व्यवसायिकांनी कित्येक दिवसांपासून बस्तान मांडले असून स्थानिक लोकांचा त्यास विरोध आहे. भंगार मार्केट हटवावे अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news