पुणे : कुपोषित बालकांवर जि. प.चे लक्ष केंद्रित | पुढारी

पुणे : कुपोषित बालकांवर जि. प.चे लक्ष केंद्रित

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार करून जिल्हा परिषदेने ग्रामविकास बालविकास केंद्रे सुरू केली आहेत. त्या माध्यमातून जिल्ह्यात आढळलेल्या 894 कुपोषित बालकांना दैनंदिन आहार, औषधे देऊन त्यांचे दररोज मॉनिटरिंग केले जात आहे. या मुलांच्या पोषणासाठी अंगणवाडीसेविकांना आगाऊ स्वरूपात जिल्हा परिषदेने निधी दिला आहे. याशिवाय शनिवार व रविवार

बालकांना दिली जाते नाचणी खीर, गहूसत्व सकाळपासून रात्री 8 वाजेपर्यंत 8 वेळा या बालकांना सकस आहार देण्यात येत आहे. या आहारामध्ये नाचणी खीर, गहूसत्व खीर, अंगणवाडीतील आहार, मेथी, कोथिंबीर मुठीया, केळी, मसाला इडली व मुरमुरा लाडू किंवा उतप्पा, थालीपीठ आदींचा समावेश आहे.

या सुटीच्या दिवशी तालुक्यातील अधिकार्‍यांना दुसर्‍या तालुक्यात जाऊन प्रत्यक्षात पाहणीची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात 894 कुपोषित बालके आढळली होती. त्यात 116 तीव्र कुपोषित बालके आहेत. या सर्वांवर 23 सप्टेंबरपासून विविध ठिकाणी सुरू असलेल्या ग्राम बालविकास केंद्रांतर्गत उपचार सुरू आहेत. यासाठी 2 हजार 155 रुपये खर्च येत असून, ती रक्कम जिल्हा परिषदेकडून प्रत्येक अंगणवाडीसेविकांना यापूर्वीच देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेकडून कुपोषणमुक्तीसाठी 28 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या आढळलेल्या 894 कुपोषित बालकांपैकी 95 टक्के बालकांमध्ये सुधारणा दिसत आहे. कुपोषणमुक्तीसाठी ग्राम बालविकास केंद्र प्रभावी ठरत आहे.

                                     – जे. बी. गिरासे, महिला व बालविकास अधिकारी

पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या :
दिनांक रुग्णसंख्या
2 नोव्हेंबर 71
1 नोव्हेंबर 58
31 ऑक्टोबर 28
30 ऑक्टोबर 57
29 ऑक्टोबर 55
28 ऑक्टोबर 59
27 ऑक्टोबर 40

Back to top button