नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुन्हेगार अर्जुन महेश आव्हाड ऊर्फ वाट्या व निखिल विलास गवळी या दुहेरी हत्याकांडाची सुनावणी बुधवार (दि.२६) पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या खटल्यातील संशयितांना शुक्रवारी (दि.२१) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामध्ये भूषण लोंढेसह संदीप रमेश गांगुर्डे व आकाश दीपक मोहिते आदींचा समावेश होता.
संशयितांच्या नातेवाइकांसह समर्थकांनी गर्दी केल्याने न्यायालयाच्या आवारात वाहनांची कोंडी झाली. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, संशयितांमध्ये माजी नगरसेवकांच्या मुलासह इतरांचा समावेश असल्याने तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी तपास करून सुमारे २५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे अंतिम निकाल लागण्याच्या शक्यतेने बुधवारी (दि.२६) होणाऱ्या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :