Dhule Protest | दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात वंचित बहुजन आघाडी व भीम आर्मीचे आंदोलन

कराचीवाला खुट परिसरात ठिय्या आंदोलन
Delhi Student Lathicharge
कराचीवाला खुट परिसरात ठिय्या आंदोलनPudhari
Published on
Updated on

Delhi Student Lathicharge

धुळे : दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने धुळे बंदची हाक दिली. शहरात काढलेल्या मोर्चानंतर कराचीवाला खुट परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत संविधानाने दिलेल्या आंदोलनाच्या अधिकाराचा उल्लेख केला. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी व भीम आर्मीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. धुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Delhi Student Lathicharge
Dhule news: बुराई नदीकाठच्या पूरग्रस्त वस्त्यांना दिलासा; 2.5 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

यात वंचित बहुजन आघाडीचे संघटक शंकर खरात, बापू बागुल, योगेश पगारे, जितू शिरसाठ, साई खरात, आकाश बागुल, एकबाल तेली, नितीन म्हसदे, राहुल वाघ, रोहित बागुल, प्रणील महिरे, राज देसले, बॉबी नागमल, निलेश इंदवे, शुभम अहिरे आदी सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडी व भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढला.

नीट पेपरफुटी प्रकरणी साक्रीत काँग्रेस व युवक काँग्रेसचे आंदोलन

पिंपळनेर : नीट पेपरफुटी प्रकरणाचा निषेध आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय युवक काँग्रेसच्या 'छात्रों की गूँज' अभियानांतर्गत साक्री तहसील कार्यालयासमोर काँग्रेस व युवक काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा निषेध व्यक्त केला.

Delhi Student Lathicharge
Dhule crime news: धुळ्यात गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांची तस्करी करणाऱ्या मालेगावच्या तरुणाला अटक

या आंदोलनात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे यांच्यासह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या आंदोलनात साक्री तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर देसले, उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, शहराध्यक्ष प्रज्योत देसले, गावित प्रदेश सचिव जयंतकुमार सोनवणे, जिल्हा महासचिव जयेश खैरनार यांच्यासह प्रकाश राऊत, सुनील बहिरम, कुंदन गांगुर्डे, संदीप भोये,रितेश नांद्रे, पीयूष नांद्रे आणि अनेक युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news