पिंपळनेर शहरात श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

पिंपळनेर शहरात श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी
Published on
Updated on

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

येथील संत सेना महाराज मंगल कार्यालयात नाभिक समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायातील संतसेना महाराज यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

साक्री तालुका पिंपळनेर नाभिक हितवर्धक संस्था आणि समाजाच्या वतीने रघुनाथ पंडित पगारे, बाळासाहेब दौलत जगताप, जगन्नाथ विश्राम हिरे, पांडुरंग सदाशिव जगताप, घनश्याम सूर्यवंशी, राजेश महाले, संजय बुधा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

यावेळी सौ. योगिता व ललित पांडुरंग जगताप, सौ. कोमल व संतोष विजयराव सोनवणे यांनी सत्यनारायण पूजन केले. यावेळी तालुकाध्यक्ष जगदीश भाऊ जगताप, पंडित सूर्यवंशी, दगडू हिरे, प्रमोद सुर्वे, अशोक याईस, दिलीप सूर्यवंशी, लक्ष्मीकांत आहिरराव, योगेश सूर्यवंशी, गुलाब खोडे, गणेश जगताप ,गिरीश सोनवणे, प्रदीप सूर्यवंशी, समीर जगताप, अमोल महाले, श्रीराम सूर्यवंशी, भाऊसाहेब सोनवणे, राहुल वसाने, सोनू हिरे, प्रसाद हिरे व समाजातील महिला मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news