Shirpur Cannabis Seizure: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात वन जमिनीवरून तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांची गांजाची रोपे जप्त

या कारवाई मध्ये सुमारे 3 कोटी 62 लाख 50 हजार रुपये किमतीचे एकुण 1450 किलो कैनाबीस ,गांजा सदृश्य अंमली पदार्थ आरोपी पंडीत सरदार पावरा कसत असलेल्या वनजमिनीवरुन जप्त करण्यात आले.
Shirpur Cannabis Seizure
Shirpur Cannabis Seizurepudhari
Published on: 
Updated on: 

धुळे पुढारी वृत्तसेवा

शिरपूर तालुक्यातील अति दुर्गम भागात वन क्षेत्राच्या अतिक्रमित गांजा शेतीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाने वनविभागाच्या मदतीने कारवाई करुन सुमारे 5 कोटी 77 लाख रुपये किंमतीचा तब्बल 2 टन 3 क्विटल 10 किलो कॅनाबीस ( गांजा) हा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे या प्रकरणात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirpur Cannabis Seizure
Karnataka Cannabis Seizure : विजापूर जिल्ह्यात एक कोटीचा गांजा जप्त

धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक अंमली पदाथांची लागवड करणारे, कब्जात बाळगणारे व वाहतुक करणारे यांच्यावर कायदेशिर कारवाई करणेकरिता निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनिय बातमी मिळाली.

Shirpur Cannabis Seizure
Satara Cannabis Seizure : गांजा विक्रीवर पोलिसांचा छापा; ९६ हजारांचा गांजा जप्त!

अतिदुर्गम भागातील फत्तेपूर मांडणीपाडा शिवार आणि वाकपाडा शिवार परिसरातील सुमारे 8 ते 10 एकर वनविभागाचे जमिनीवर पंडीत सरदार पावरा, (रा.सरदारपाडा चाकडु ता. शिरपूर), मोयला रेशम्या पावरा व बन्सीलाल रसूल पावरा (दोन्ही रा. वाकपाडा ता. शिरपूर) व एक अज्ञात इसम यांनी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अंमली पदार्थ अवैधरित्या कॅनाबोस वनस्पतीची लागवड करुन, त्याची विक्री करण्याचे उद्देशाने राखण व संवर्धन करीत असल्याची माहिती मिळाली.

Shirpur Cannabis Seizure
Karad cannabis seizure: स्टेडियम झोपडपट्टीतून 2 लाखांचा गांजा जप्त

त्यानुसार ही माहिती वनविभागाला देऊन सपोनि दिपक ढोके, शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे पोउनि मिलींद पवार, पोउनि हेमंत खैरनार तसेच वनपाल मालकातर बी.ए. महाले, वनरक्षक अमोल भोये व धनराज पाटील आणि पोलीस अंमलदार सतिष जाधव, संदिप साहेबराव पाटील, शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, दिनेश परदेशी, पवन गवळी, नरेंद्रसिंग गिरासे, जितेंद्र अहिरराव, सुरेश भालेराव, देवेंद्र ठाकुर, महेंद्र सपकाळ, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, अतुल निकम, हर्षल चौधरी, प्रशांत माळे, रविंद्र महाजन, नितिन दिवसे, सिध्दार्थ निकम आणि शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे सागर ठाकुर, संदीप ठाकरे, रुपेश गांगुर्डे, रणजित वळवी, विजय ढिवरे, स्वप्निल बांगर, रामदास पावरा, मनोज पाटील, संजय भोई, कृष्णा पावरा या पथकाच्या मदतीने वेगवेगळ्या शेतांमध्ये छापा सत्र राबवण्यात आले.

Shirpur Cannabis Seizure
Cannabis seizure: न्हाणीतून हस्तगत केली गांजाची तीन झाडे

या कारवाई मध्ये सुमारे 3 कोटी 62 लाख 50 हजार रुपये किमतीचे एकुण 1450 किलो कैनाबीस ,गांजा सदृश्य अंमली पदार्थ आरोपी पंडीत सरदार पावरा कसत असलेल्या वनजमिनीवरुन जप्त करण्यात आले.तर सुमारे 75 लाख रु.कि.चे एकुण 300 किलो कैनाबीस, गांजा सदृश्य अंमली पदार्थ अज्ञात आरोपी कसत असलेल्या वनजमिनीवरुन ताब्यात घेण्यात आला. तसेच सुमारे 90 लाख 21,हजार 500 रुपये किमतीचा एकुण 360 किलो 860 ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ आरोपी मोयला रेशम्या पावरा कसत असलेल्या वनजमिनीवरुन जप्त करण्यात आला.

तसेच सुमारे 50 लाख रु.कि.चे एकूण 200 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ आरोपी बन्सीलाल रसुल पावरा कसत असलेल्या वनजमिनीवरुन जप्त करण्यात आला .अशा प्रकारे पथकाने सुमारे 5 कोटी 77 लाख 71 हजार 500 रु. किं. चे एकुण 2310 किलो 860 ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news