Cannabis seizure: न्हाणीतून हस्तगत केली गांजाची तीन झाडे

जत पोलिसांची कारवाई , बाज येथील प्रकार
crime news
crime newsPudhari
Published on
Updated on

जत : जत तालुक्यातील बाज येथे पोलिसांनी छापा टाकून संशयित आरोपीच्या घरातील न्हाणीतून तीन गांजाची झाडे हस्तगत केली. याची किंमत 6 हजार रुपये इतकी असून, या प्रकारणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बाज येथे संशयित चंद्रकांत सूर्याबा मासाळ (वय 55) याच्या घरी पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत 261 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. मासाळ याने आपल्या घराच्या पूर्व बाजूस असणाऱ्या न्हाणीमध्ये गांजाची तीन झाडे विक्री करण्याच्या उद्देशाने लावली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. यात दोन झाडे, तर एक अर्धवट सुकलेले झाड मिळून आले आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सागर करांडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार जत पोलिसांनी अमली पदार्थ कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक लातूरे करीत आहेत.

पोलिसांची मोठी कारवाई

जत शहरासह तालुक्यात गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. अनेक वर्षापासून तालुक्यातील काही भाग गांजा लागवड आणि तस्करीसाठी चर्चेत आहे. परंतु पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे दिसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news