पिंपळनेर : प्रामाणिकपणाचा आदर्श, सापडलेले तेहत्तीस हजार रुपये वृद्ध यात्रेकरूंना केले परत

यमुनेत्रीला सापडलेले तेहत्तीस हजार गुप्ता कुटुंबीयांना परत करतांना साक्री येथील प्राचार्य बी. एम. भामरे.
यमुनेत्रीला सापडलेले तेहत्तीस हजार गुप्ता कुटुंबीयांना परत करतांना साक्री येथील प्राचार्य बी. एम. भामरे.

पिंपळनेर, जि.धुळे : अंबादास बेनुस्कर
साक्री येथील विविध सामाजिक चळवळीत काम करणारे व सेवा निवृत्ती नंतरही इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य पदाची धुरा सांभाळणारे प्राचार्य बी.एम. भामरे यांनी यमुनेत्रीला सापडलेले 33 हजार रुपये राजस्थान येथील बुद्ध यात्रेकरुंना परत करत प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला आहे.

गेल्या पंधरवाड्यात मालपूर, कासारे, साक्री, धुळे व चाळीसगाव येथील 24 यात्रेकरु अमरावतीच्या वर्ल्ड फ्लाईंग ट्रॅव्हल्स डेस्टीनेशन कंपनी द्वारा उत्तराखंड तथा देवभूमित चारधाम यात्रेला रवाना झाले होते. सर्व यात्रेकरु दुस-या दिवशी यमुनेत्रीला गेले असता, प्राचार्य भामरे यांनी देवी दर्शनानंतर शुज घेण्यासाठी गेले असता तेथे पाचशेच्या नोटांचे बंडल त्यांना सापडले. त्याच क्षणी त्यांनी आपल्या सहका-यांना सांगून खुलासाही केला. ज्यांचे पैसे हरवले होते ती व्यक्ती त्या ठिकाणाहून निघून गेली होती. त्यानंतर त्यांनी गृप फोटो घेणं, यमुनेत्रीचे जल बाटलीत भरूण घेणं, आदी कामे उरकून घेत पैसे सापडलेल्या ठिकाणी परत येवून कुणी पैशांच्या शोधात आले आहे का? याचा शोध घेतला. खरोखर ज्या व्यक्तीचे पैसे हरवले होते ती व्यक्ती व त्यांची पत्नी तणावामध्ये पैशांचा शोध घेतांना आढळून आले. ते बघून भामरे यांनी त्याची चौकशी केली. प्राचार्य भामरे यांनी नोटांचे वर्णन विचारून खात्री करुन घेतली. तुमचे पैसे मला सापडल्याचे सांगितले. नोटांचा बंडल बघून वृद्ध दाम्पत्यांनी नि:श्वास सोडला व आभार मानत धन्यवाद दिले.

पैसे गहाळ झालेले वृद्ध दामप्त्य राजस्थान येथील, सेवानिवृत्त गुप्ता नावाचे मुख्याध्यापक असल्याचे सांगितले. जीवनात सत्कर्माला प्रथम प्राधान्य द्यावे असे भामरे यांनी आभारास प्रतिसाद देतांना सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news